Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

शिवाच्या प्रोपोजलला काय असेल आशुचा प्रतिसाद ?

*शिवाच्या प्रोपोजलला काय असेल आशुचा प्रतिसाद ?* 'शिवा' मालिकेत शिवाच्या मनात आशुसाठी भावना दृढ होत असताना, आशु एका प्लांटच्या व्हिजिटसाठी जाताना शिवाला सोबत घेऊन जातो. परत येताना त्यांची गाडी एका जंगलात बंद पडते आणि त्यांना एका आदिवासी पाड्यावर रात्रभर थांबाव लागत, तिथे त्यांना नवरा- बायको असण्याच नाटक करावं लागत. आदिवासी पाड्यावर दोघे एकत्र डान्स करतात, एका ताटात जेवणं करतात. भविष्य सांगणारा एकजण आशुला सांगतो की तुझ्या होणार्‍या बायकोच आणि आईच काही काळ पटणार नाही, आशुला हे दिव्याबद्दल वाटत. शिवाला तिथल्या बायका एका झाडाच पान देतात आणि मनात इच्छा मागून ते चुरगळायला सांगतात .
शिवाला आशुसोबत एकत्र वेळ घालवल्याने छान वाटतय आणि ती मनात इच्छा व्यक्त करते की ती आणि आशु कधी एकत्र येतील का ? ती पान चुरगळते तर तिचा हात लाल होतो. त्यारात्री आशु झोपेत तिचा तो हात हाती घेऊन झोपतो. ते दोघे परत आल्यावर शिवा गॅंगसमोर कबुली देते की तिला आशु आवडतो. शिवाच्या वागण्यात बदल झालेला आज्जीलाही जाणवतोय. आशुने चांगला रिपोर्ट तयार केला म्हणून रामभाऊ त्याला शाबासकी देतात आणि यामुळे खुश होऊन आशु शिवाला कानातले गिफ्ट करतो. तर शिवा, आशुसाठी कविता करताना दिसते. सगळी गॅंग एकत्र येऊन दिव्या आणि आशुच लग्न मोडायचा प्लॅन बनवतात . ते शिवाला म्हणतात की तुझ्या मनातल्या भावना आशुला सांग, त्यासाठी ते गॅरेज सजवतात.
शिवा आशुला आपल्या मनातलं सांगू शकेल ? काय होईल जेव्हा तिला आशु- दिव्याची लग्नाची तारीख कळेल? सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'शिवा' दररोज रात्री ९ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.