*पारू लग्न सराई विशेष भाग !*
May 23, 2024
0
*पारू लग्न सराई विशेष भाग !*
पारू मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडताना दिसत आहे. या मालिकेत पारूच आयुष्य बदलणार आहे. किर्लोस्करांच्या बिझनेसची ब्रँड ॲम्बेसेडर म्हणून पारू आजवर उत्तम सहकार्य करत आली आहे, पारुसाठी खूप महत्वाचा दिवस आहे कारण किर्लोस्करांच्या बिझनेससाठी एका भव्य जाहिरातीच चित्रीकरण होत आहे. ह्या चित्रीकरणासाठी मंडप सजला आहे, पारूने लग्नाचा जोड घातला आहे, नवरदेवाच्या पोशाखात आदित्य तयार आहे. भटजींनी मंत्र सुरु केले आणि लग्न विधी सुरु झाला आहे.
आदित्यने, पारूच्या गळ्यात मंगळसूत्र ही घातलं पण विवाह संपन्न झाला असं बोलायच्या ऐवजी दिग्दर्शकानी शॉट कट केला. पारूचे दागिने काढले गेले, गळ्यातला हार देखील काढला, लाईट्स ऑफ केल्या गेल्या आणि पारूच्या आयुष्यात जसा अंधार झाला. तिला काही काळेनासे झाले. पारूने आपल्या गळ्यातले मंगळसूत्र काढून नाही दिले कारण तिच्यासाठी हे नातं जन्मो जन्मानंतरासाठी बांधलं गेले आहे. पारूच्या आयुष्यात क्षणात नियतीचे फासे फिरले आणि दुःखाचे काटे तिच्या मनात रुतले. काय होईल जेव्हा आदित्य आणि अहिल्यादेवी समोर पारू आपलं हे सत्य ठेवेल.
*आदित्य पारूला आपल्या पत्नीचा दर्जा देईल? अहिल्या, पारूला आपली सून म्हणून स्वीकारेल ? यासाठी पाहायला विसरू नका लग्न सराई विशेष 'पारू' २७ मे पासून संध्या. ७:३० वा फक्त आपल्या झी मराठीवर.*