आयुष्मान खुराना, दुआ लिपा न्यूयॉर्कमधील TIME100 गालामध्ये सहभागी होणार!
April 24, 2024
0
दोन वेळचा TIME सन्मान विजेता आयुष्मान खुराना, दुआ लिपा न्यूयॉर्कमधील TIME100 गालामध्ये सहभागी होणार!
बॉलीवूड स्टार आणि युथ आयकॉन आयुष्मान खुराना न्यूयॉर्कमधील प्रतिष्ठित TIME100 गाला कार्यक्रमात उपस्थित राहणार आहे ज्यात आयकॉनिक टाइम मॅगझिन जगातील सर्वात प्रभावशाली व्यक्तींना सन्मानित करते!
आयुष्मानला TIME मासिकाने दोनदा सन्मानित केले आहे - TIME100 Impact Award 2023 आणि TIME100 साठी ज्यात त्याची 2020 मध्ये जगातील 100 प्रभावशाली व्यक्तींमध्ये निवड झाली होती! TIME ने आयुष्मानला मोठ्या कार्यक्रमासाठी आमंत्रित केले आहे ज्यामध्ये जगातील सर्वात मोठी नाव एकाच खोलीत एकत्र येतील .
त्यांच्या डिसरप्टिव सिनेमाच्या ब्रँडद्वारे भारतातील कन्टेन्ट पुढे ढकलण्यात त्यांच्या अमूल्य योगदानासाठी तसेच बाल हक्क संरक्षणासाठी युनिसेफ राजदूत म्हणून त्यांनी केलेल्या अनुकरणीय कार्यासाठी त्यांना ही मान्यता मिळाली आहे. गेल्या वर्षी TIME100 इम्पॅक्ट पुरस्कारासाठी निवडलेला आयुष्मान खुराना हा एकमेव भारतीय होता!
आयुष्मान आज TIME100 गालामध्ये जगातील सर्वात मोठी पॉप स्टार दुआ लिपा सोबत दिसणार आहे. या कार्यक्रमात सोफिया कोपोला (चित्रपट दिग्दर्शक आणि पटकथा लेखक), इलियट पेज (अभिनेता आणि चित्रपट निर्माता), काइली मिनोग (गायक-गीतकार आणि अभिनेत्री), मॅक्स यांसारख्या दिग्गज आणि प्रतिष्ठित व्यक्तिमत्त्वांची देखील ह्या कार्यक्रमात हजार राहण्याची अपेक्षा आहे. Verstappen (F1 ड्रायव्हर), मायकेल जे. फॉक्स (चित्रपट अभिनेता), ताराजी पी. हेन्सन (अमेरिकन अभिनेत्री), टोरी बर्च (डिझाइनर) आदि नावे असतील.