१९ मे ला स्टार प्रवाहवर पाहा ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
April 25, 2024
0
महाराष्ट्राचा सुपरहिट चित्रपट बाईपण भारी देवा पहिल्यांदाच पहायला मिळणार महाराष्ट्राची नंबर वन वाहिनी स्टार प्रवाहवर
१९ मे ला स्टार प्रवाहवर पाहा ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर
बाईपण भारी देवा सिनेमाने २०२३ हे वर्ष चांगलंच गाजवलं. फक्त महिला वर्गच नाही तर लहानांपासून मोठ्यांपर्यंत प्रत्येकानेच या सिनेमाला भरभरुन प्रेम दिलं. रोहिणी हट्टंगडी, वंदना गुप्ते, सुचित्रा बांदेकर, शिल्पा नवलकर, सुकन्या मोने आणि दीपा परब या मुख्य भूमिका साकारलेल्या सर्व अभिनेत्रींवर कौतुकाचा वर्षाव झाला. मंगळागौर स्पर्धा जिंकण्यासाठी सहा बहिणींची होणारी तारेवरची कसरत आणि ही कसरत करता करता बहिणींमधलं खुलत जाणारं नातं या चित्रपटाची उत्सुकता शेवटपर्यंत ताणून धरतात. बॉक्स ऑफिस गाजवणारा महाराष्ट्राचा हा लाडका चित्रपट महाराष्ट्राच्या नंबर वन वाहिनीवर पहाता येणार आहे. १९ मे ला सायंकाळी ७ वाजता स्टार प्रवाहवर ‘बाईपण भारी देवा’चा वर्ल्ड टेलिव्हिज प्रीमियर होणार आहे.
तीन वर्ष सातत्याने नंबर वन रहात स्टार प्रवाह वाहिनीने मराठी मनोरंजन वाहिन्यांच्या विश्वात आपलं वर्चस्व सिद्ध केलं आहे. सकस लिखाण, आपलीशी वाटणारी पात्र आणि सोबतीला उत्तम दिग्दर्शन हे स्टार प्रवाहच्या मालिकांचं वेगळेपण. मराठी परंपरा, मराठी प्रवाह हे ब्रीदवाक्य जपत भरभरुन मनोरंजन देण्याचा स्टार प्रवाह वाहिनीने नेहमीच प्रयत्न केला आहे. दर्जेदार मालिकांप्रमाणेच अनेक दर्जेदार चित्रपट पहिल्यांदा स्टार प्रवाह वाहिनीवर पहायला मिळतात. बाईपण भारी देवा चित्रपटाच्या वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियरविषयी सांगताना स्टार प्रवाहचे व्यवसाय प्रमुख सतीश राजवाडे म्हणाले, ‘सकस मनोरंजन, सर्वांना भावणारा आशय ही स्टार प्रवाहची ताकद आहे. रसिकांना दर्जेदार मालिका आणि चित्रपट देण्याच्या हेतूने बाईपण भारी देवा सारखा सुपरहिट चित्रपट स्टार प्रवाहवर सादर होतोय. आपल्या परंपरेला जोडून मांडलेला हा चित्रपट एक यशस्वी आणि मोठा चित्रपट आहे. हा चित्रपट स्टार प्रवाहवर येतोय याचा आनंद आहे.’
तेव्हा आपल्या संपूर्ण कुटुंबासोबत पाहायला विसरु नका बाईपण भारी देवा चित्रपटाचा वर्ल्ड टेलिव्हिजन प्रीमियर रविवार १९ मेला सायंकाळी ७.०० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.