आशूच्या पार्टी मध्ये शिवाचे नवे रूप*
April 16, 2024
0
*आशूच्या पार्टी मध्ये शिवाचे नवे रूप*
'शिवा' मालिकेच्या येत्या आठवड्यात मध्ये खूप साऱ्या घडामोडी घडणार आहेत. आपण पाहिलं आशु दिव्याच्या प्रेमात आहे हे सत्य पाना गँगला कळतं आणि पाना गँग मध्ये दोन गट पडतात, अप्पर डिप्पर आणि सायलेंसर व स्टेपणी.
अप्पर डिप्परला असं वाटतंय की शिवाला सगळं सत्य कळलं पाहिजे. तर सायलेंसर व स्टेपणीला शिवा पर्यंत ह्या गोष्टी पोहोचू नये असं वाटतंय. आपणच आशु आणि शिवाच जुळवून देऊ म्हणजे त्यांचंच लग्न होईल. तर दुसरीकडे आशु शिवा आणि दिव्याला पार्टीसाठी आमंत्रित करतो. आशु आमंत्रणाबरोबर शिवाला पार्टीसाठी नवीन कपडे देतो. शिवा पार्टी मध्ये आशुने दिलेले कपडे घालून येते. पार्टीमध्ये शिवाचंच सगळे कौतुक करतात, आशुचे मित्र असं समजतात की शिवा आणि आशूचं लग्न ठरलय. पार्टीत आशु शिवाची खास काळजी घेतो.
शिवाला काटा चमच्याने खाता येत नाही म्हणून आशु देखील हाताने खातो आणि तिला कम्फरटेबल करायचा पूर्ण प्रयत्न करतो. शिवा पार्टी मध्ये असताना वस्तीतील लोक शिवाच्या गॅरेजवर जातात आणि तिने सांगितल्याप्रमाणे आम्ही त्या पेपर्सवर सह्या केल्याचं सांगतात, आणि त्यामुळे आमचं घरदार जाणार आणि त्यांच्या जागेवर कब्जा होणारे हे कळतं. वस्तीतले लोक खूप टेन्शन मध्ये आहेत ते गँगला सांगतात की शिवा ह्या प्रोजेक्टच्या मालकासोबत म्हणजे आशुसोबत फिरत आहे. शिवाला वस्तीतल्या लोकांचे सत्य कळते आणि तिला धक्का बसतो. आशु अस काहीतरी करू शकेल यावर तिचा विश्वास बसत नाही.
आता शिवा, आशुला ह्या प्रोजेक्टच्या मागचं सत्य विचारले? आशुने शिवा बरोबर केलेली मैत्री त्याच्या स्वार्थासाठी होती का? हे सगळं तुम्हाला ह्या आठवड्यात पाहायला मिळेल तेव्हा बघायला विसरू नका 'शिवा' दररोज रात्री ९ वा.फक्त झी मराठीवर.