मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनमध्ये समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
April 05, 2024
0
मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनमध्ये समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी दिसणार सूत्रसंचालकाच्या भूमिकेत
फुलाला सुगंध मातीचा मालिकेतील शुभम-कीर्ती पुन्हा दिसणार एकत्र!
स्टार प्रवाहवरील फुलाला सुगंध मातीचा मालिकेतून प्रेक्षकांच्या घराघरात पोहोचलेली लाडकी जोडी अर्थात शुभम आणि कीर्ती म्हणजेच अभिनेत्री समृद्धी केळकर आणि हर्षद अतकरी पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनच्या गुढीपाडवा विशेष भागात समृद्धीला सूत्रसंचालनात साथ देणार आहे अभिनेता हर्षद अतकरी.
यंदाच्या पर्वाचं वेगळेपण म्हणजे स्पर्धक जोडीने नृत्य सादर करतात. आई-मुलगी, गुरु-शिष्य, मामा-भाचे, बहिणी-बहिणी अशी अनेक नाती आणि त्यांची नृत्यकला या मंचावर पहायला मिळत आहे. स्पर्धकांसोबतच सूत्रसंचालनही जोडीने सादर होतंय. समृद्धीसोबतच स्टार प्रवाह परिवारातले कलाकार सूत्रसंचालकाची भूमिका पार पाडतात. मन धागा धागा मालिकेतील सार्थक आणि साधी माणसं मालिकेतील सत्यानंतर आता अभिनेता हर्षद अतकरी सूत्रसंचानलाची भूमिका पार पाडताना दिसेल. समृद्धी आणि हर्षदच्या जोडीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. त्यामुळे ही लोकप्रिय जोडी पुन्हा एकदा पहाण्याची संधी मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वनचा मंच घेऊन आला आहे. तेव्हा पाहायला विसरु नका मी होणार सुपरस्टार जोडी नंबर वन शनिवार आणि रविवारी रात्री ९ वाजता फक्त स्टार प्रवाहवर.