आकाश आणि वसुमध्ये फुलतंय प्रेमाचं नातं !
April 23, 2024
0
*आकाश आणि वसुमध्ये फुलतंय प्रेमाचं नातं !*
'पुन्हा कर्तव्य आहे' ह्या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय, आकाश आणि वसूची केमिस्ट्री प्रेक्षकांना धावतेय. मालिकेत सध्या आकाश आणि वसूच्या नात्यात खूप घडामोडी घडताना दिसत आहेत. आकाशला वसुंधराला भेटून मनातलं सगळं बोलायचं आहे, वसुच्या मनातही तेच आहे. पण आकाश ज्या हॉटेलमध्ये वसुंधराला भेटायला बोलवतो ते हॉटेल त्याला काही चांगलं वाटत नाही, आकाश वसुंधराला फोन करण्याचा प्रयत्न करतो पण वसूसोबत बोलणं होत नाही. आकाश तिथून निघेपर्यंत वसुंधरा त्या हॉटेलवर पोहोचते आणि तिथला माहोल बघून तिचा गैरसमज होतो आणि ती आकाश वर चिडते आणि इतक्यात त्या हॉटेलवर पोलिसांची धाड पडते.
आकाशची कमिशनर बरोबर ओळख असल्यामुळे पोलिसांकडून त्यांची सुटका होते. वसु आकाश वरती खूप भडकते. ती घराच्या दिशेने चालत निघते. वसुंधरा आता आकाशची जबाबदारी असल्याने तो तिच्या मागे जाऊन तिला खूप समजावण्याचा प्रयत्न करतोय. हळूहळू ह्या दोघांमध्ये एक नवीन नातं निर्माण होत आहे. वसुला ही कुठे ना कुठे ह्या नवीन नात्याची जाणीव होतेय. पण वसुंधरा आकाशच ऐकून घेईल? आकाश-वसु मधले गैरसमज दूर होतील ? साखरपुड्याच्या दिवसापासून आकाशनी, वसुंधराची जबाबदारी घेऊन तिला आपल्या आयुष्यात महत्वाची जागा दिली आहे. आता प्रेक्षकांना वेध लागलेत ते आकाश आणि वसुंधराच्या लग्नाचे.
तेव्हा पाहायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.