नेत्रा करणार अस्तिकाचा वध
April 04, 2024
0
*नेत्रा करणार अस्तिकाचा वध*
‘सातव्या मुलीची सातवी मुलगी’ मालिकेत लवकरच मोठा व्टिस्ट पहायला मिळणार आहे. अस्तिका विरोचकाने दिलेला काळा मणी तिच्याकडे असल्यामुळे सुरक्षित रहात होती. हे अव्दैत नेत्राला सांगतो. त्याचवेळी रूपालीसुध्दा अस्तिकाला सांगते की अव्दैत-नेत्रा दोघे मिळून तुझा वध करण्याचा प्रयत्न करतील. तसेच घरातील सगळेजण त्यांना साथ देतील. त्या आधीच अव्दैतचा जीव घे आणि नागरूपात येऊन खोलीत लपून रहा. अस्तिका गोंधळून जाते, काय करावं हे तिला कळत नाही. त्यानंतर ती अव्दैतच्या प्रेमळ बोलण्यात अडकते. तरीही रूपाली अस्तिकाला अव्दैतच्या जाळ्यातून सोडवते आणि तिला सांगते, की अव्दैतला पुन्हा मारण्याचा प्रयत्न कर.
नेत्रा विरोचकाची खेळी पूर्णपणे ओळखते. आणि घरातल्या सर्वांना एकत्र रहा असं सांगते. त्यानंतर नेत्रा अस्तिकाचा वध करण्यासाठी काय मार्ग असू शकेल, यावर विचार करते. राजाध्यक्ष कुटुंब नेत्राला अस्तिकाचा वध करताना कशी मदत करणार, नेत्रा अव्दैतचा जीव वाचवून मग अस्तिकाचा वध कसा करणार, हे प्रेक्षकांना लवकरच पहायला मिळणार आहे.
पाहायला विसरू नका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी’ ' दररोज रात्री १०:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.