Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*अहिल्या पारु सोबत वैजूला सुद्धा घरात राहण्याची परवानगी देईल ?*

*अहिल्या पारु सोबत वैजूला सुद्धा घरात राहण्याची परवानगी देईल ?* 'पारू' मध्ये सध्या खूप काही घडताना दिसत आहेत. एकीकडे गुरुजींनी अहिल्याला एक कठीण व्रत करायला सांगितलं आहे. अहिल्या गुरुजींनी सांगितल्या प्रमाणे कठीण पद्धतीने उपवास करून व्रत करते. तर दुसरीकडे आदित्य एका डोळ्यांच्या प्रेमात पडतो , ते डोळे पारुचे आहेत याची त्याला कल्पना नाहीये. पारु अहिल्यादेवीची ओटी भरते आणि त्यांचा आशीर्वाद घेते. दामिनीचे कट कारस्थानं चालूच आहेत, ह्यावेळी तिचा डोळा वैजूवर आहे. दामिनीने वैजूला गायब केले आहे. वैजूला राहायला जागा नसल्यामुळे पारू टेन्शन मध्ये आहे. इकडे आदित्यला कळतं वैजू गायब झाली आहे आणि दामिनीने वैजूला विकले आहे. आदित्य जाऊन वैजूला सोडवूं आणतो. पण आता प्रश्न हा निर्माण झाला आहे की वैजूची राहायची व्यवस्था कुठे करू शकतो. ह्यासाठी आदित्य अहिल्याकडे वैजुला घरात ठेवायची परवानगी मागायला जातो. पण अहिल्यादेवी वैजूला घरात ठेवायची परवानगी देतील ? हे सगळं जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'पारू' दररोज संध्या. ७:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.