वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का?
April 12, 2024
0
*वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का?*
'पुन्हा कर्तव्य आहे' ह्या मालिकेला प्रेक्षकांचा तुफान प्रतिसाद मिळताना दिसतोय, आकाश आणि वसूच्या साखरपुड्याची लगबग सुरु आहे. तेव्हाच गुरुजी सांगतात दोघांच्याही पत्रिका छान जुळतायत, पण एक छोटी अडचण आहे पण एक हवन केला तर तो दोषही निघून जाईल, घरच्यांच्या मनधरणीनंतर दोघेही देवळात जायला तयार होतात. अवनीच्या ठरल्या प्लानप्रमाणे आकाश आणि वसु एकाच मंदिरात हवन करण्यासाठी जातात. तर दुसरीकडे माधव सांगतो की वसु आणि आकाश यांच्या साखरपुड्याचा उद्याचा मुहूर्त निघाला आहे, कारण त्यानंतर पुढचे सहा महिने मुहूर्त नाही. दोन्ही घरात साखरपुड्याची लगबग सुरू आहे. ठाकूर फॅमिली मध्ये उत्साहाचं वातावरण आहे सगळेजण साखरपुड्यासाठी तयार होतात आकाशला बघून सगळे खुश होतात. पिंकी वसुंधराला तयार करते. रानडे फॅमिली मध्ये सगळे खुश आहेत. पण बाजूला ठेवलेली रिंग बघून वसुंधराला तिचा भूतकाळ आठवतो आता वसु आकाशला आपल्या आयुष्यात जागा देऊ शकेल का?
तेव्हा बघायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' दररोज रात्री ९:३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर