*एजे आणि लीलाच्या मेहंदीत सोनालीचा धमाका !*
April 30, 2024
0
*एजे आणि लीलाच्या मेहंदीत सोनालीचा धमाका !*
*'नवरी मिळे हिटलरला' मेहंदी विशेष भाग*
‘नवरी मिळे हिटलरला’ प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे, एजे आणि लीलाची केमिस्ट्री प्रेक्षकांना भावते आहे, मालिकेत एजे आणि लीला ही इम्परफेक्ट जोडी एकत्र येईल का सर्वांचं लक्ष लागलं आहे. दोघांचा साखरपुडा पार पडल्यानंतर आता मेहंदीचा कार्यक्रम होणार आहे. जसा साखरपुडयात ट्विस्ट आला होता तसच मेहंदी मध्ये हंगामा होणार का ? एजे आणि लीलाच लग्नकार्य विना अडथळा पार पडणार का ? ही जोडी इतर जोड्यांपेक्षा वेगळी आहे. मेहंदी मध्ये लीलाने एक घोळ घातला आहे पण ती ह्या घोळात एकटी नाही.
जहागीरदारांची इज्जत रस्त्यावर आणण्यासाठी कोणाचे प्रयत्न चालू आहेत हे येणाऱ्या भागांमध्ये कळेलच हा सगळा गोंधळ एकीकडे चालू असताना ही मेहेंदीची लगबग सुरु आहे. एजेचा मेहेंदी सोहळा हा साधा नक्कीच नसणार. या सोहळयात मराठी चित्रसृष्टीतला एक चेहेरा हजेरी लावणार आहे. हो या मेहेंदी सोहळ्यात अभिनेत्री ‘सोनाली कुलकर्णीचा’ खास परफॉर्मन्स होणार आहे. पण एजेच्या सुना- दुर्गा, लक्ष्मी आणि सरस्वती या लीला ही त्यांची सासू होणार आहे या विचाराने निराश आहेत.
अभिराम जहागीरदार आणि लीलाचा मेहंदी सोहळा निर्विघ्न संपन्न होईल का? आणि संपन्न झाला तरी ह्या दोघांचं लग्न होईल? एजेच्या सुना ह्या लग्नामध्ये काही अडथळे आणतील का? हे पाहणे खूप रंजक असणार आहे. तेव्हा पाहायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' मेहंदी विशेष भाग रविवार २८ एप्रिल रात्री १० वा फक्त आपल्या झी मराठीवर.