Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*"अप्सरा" चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च*

*"अप्सरा" चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लॉन्च* *प्रेम,सुमधुर संगीत,राजकारण, अॅक्शनची मेजवानी?* *"अप्सरा" १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात* प्रेम, राजकारण, अॅक्शन आणि सुरेल संगीताची मेजवानी "अप्सरा" या चित्रपटातून प्रेक्षकांना मिळणार आहे. चित्रपटाचा धमाकेदार ट्रेलर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला असून, अप्सरा हा चित्रपट येत्या १० मे पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.
सुनील भालेराव यांच्या ‘श्रमण फिल्म्स’ या निर्मिती संस्थेतर्फे “अप्सरा” चित्रपटाची निर्मिती करण्यात आली असून, त्यांची ही पहिलीच निर्मिती आहे. चित्रपटसृष्टीत अनेक वर्षं कार्यरत असलेल्या चंद्रकांत पवार यांनी या चित्रपटाची कथा, पटकथा आणि दिग्दर्शन केलं आहे. चित्रपटातील तीनही गाण्यांचं लेखन आणि संगीत दिग्दर्शन मंगेश यांनी केले असून या चित्रपटाच्या निमित्ताने त्यांनी संगीत दिग्दर्शक म्हणून पदार्पण केले आहे. गायक अभय जोधपूरकर गायिका आनंदी जोशी, ओंकार स्वरुप, भैय्या मोरे, मेघा मुसळे यांच्या सुमधुर आवाजात चित्रपटातील गीते स्वरबद्ध करण्यात आली असून ही गीते प्रेक्षकांच्याही पसंतीस उतरली आहेत. अभिनेता सुयश झुंजुरके, अभिनेत्री मयूरी आव्हाड, अक्षता पाडगावकर, अभिनेत्री मेघा घाडगे, शशांक शेंडे, विठ्ठल काळे, मयूर पवार, खान्देशरत्न सचिन कुमावत,विजय निकम, राजेश भोसले, आशिष वारंग,समीक्षा भालेराव, प्रज्ञा त्रिभुवन,संघर्ष भालेराव अशी तगडी स्टारकास्ट या चित्रपटात आहे. राजा फडतरे यांनी छायांकन, निलेश राठोड यांनी संकलन, तर सुबोध आरेकर, इमरान मालगुणकर, कृतिक माझिरे यांनी नृत्यदिग्दर्शन केलं आहे.
एका तरुणाच्या मनात असलेलं एका अप्सरेचं चित्र, त्याला भेटणारी तरुणी, त्याचं बदलणारं आयुष्य या संकल्पनेवर "अप्सरा" हा चित्रपट बेतला आहे. एक अनोखी प्रेमकथा असलेल्या अप्सरा या चित्रपटाच्या ट्रेलरमधून कथेचा थोडाफार अंदाज बांधता येतो. तरुणाला भेटणारी त्याच्या मनातली अप्सरा आणि त्यानंतर होणारं राजकारण, त्या सगळ्याला तो तरूण कसा सामोरा जातो याचं कथानक चित्रपटात पाहायला मिळणार आहे. सुरेल गाणी, उत्तम अभिनय यासर्वाना अॅक्शनची जोडही कमालीची आहे. त्यामुळे "अप्सरा" हा चित्रपट प्रेक्षकांचं पुरेपूर मनोरंजन करणार ठरणार आहे यात शंका नाही. *Trailer Link* https://youtu.be/LITwxtksQhY?si=N8MwbPbriUKri_BV

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.