Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*पडद्यावर येण्याआधीच रसिकांची आवडती झालेली कलर्स मराठीची आणखी एक मालिका… 'सुख कळले'!!*

*पडद्यावर येण्याआधीच रसिकांची आवडती झालेली कलर्स मराठीची आणखी एक मालिका… 'सुख कळले'!!!!!* कलर्स मराठीवर येत्या २२ एप्रिलपासून सोमवार ते शुक्रवार रात्री ९ वा.
महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात, नव्या जल्लोषात नवं वर्ष साजरं करायला सिद्ध झालीय.. सज्ज झालीय. या नव्या बदलाची सुरूवात नुकतीच ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे दणदणीत केल्यानंतर कलर्स मराठी “सुख कळले “ ही नवी मालिका आपल्या मायबाप रसिकांच्या भेटीला आणतेय. या निमित्ताने आयोजिलेल्या कार्यक्रमाला भरत जाधव, सरिता जाधव, आदेश बांदेकर यांचीही उपस्थिती होती. यावेळी त्यांच्यासोबत मजेदार खेळही खेळण्यात आले. आपल्या सुखी संसाराची स्वप्नं पूर्ण करायला वेगवेगळ्या कसोट्यांमधून तावून सुलाखून जाणाऱ्या जोडप्याची ही कथा. परिस्थितीच्या वेगवेगळ्या वादळातून जाताना एकमेकांचा विश्वास , प्रेम आणि परस्परांची साथ जपत मार्ग काढणाऱ्या माधव- मिथिलाची गोष्ट म्हणजे ‘ सुख कळले!’ सुख नेहमी हक्क, अधिकार मिळवण्यातच असतं, असं नाही तर ते त्यागातही असू शकतं… स्वतःला जिंकताना बघण्यात सुख असतंच पण कधीकधी दुसऱ्याला जिंकवण्यात नि जिंकलेलं पाहण्यातही सुख असू शकतं. माधव- मिथिलाचं सुख कशात आहे, हे सांगणारी , त्यांच्या निखळ , निःस्वार्थी प्रेमाची ही कथा म्हणजेच ‘सुख कळले!’ २२ एप्रिलपासून कलर्स मराठीवर दाखल होतेय. याचे सगळे गोड प्रोमो रसिकांच्या भेटीला आले नि रसिकांनी मालिका पडद्यावर येण्याआधीच मालिकेला आपले करायला सुरूवात केलीय. माधव- मिथिलाच्या भूमिकेत रसिकांना भेटायला येणाऱ्या सागर देशमुख आणि स्पृहा जोशी यांच्या कमाल जोडीचं प्रेक्षक खूप कौतुक करतायत. या कसदार कलावंतांना पडद्यावर एकत्र पाहणं हेही सुखच असणार आहे, अशी प्रेक्षकांची प्रतिक्रिया मिळतेय. मराठी मनोरंजनाच्या इतिहासांत पडद्यावर येण्याआधी रसिकांची लाडकी होणारी “इंद्रायणी” मालिकेनंतर ही दुसरी मालिका आहे, याचा कलर्स मराठीला नितांत अभिमान आहे.
आपल्याकडे प्रत्येक गोष्ट असणे म्हणजे सुख नाही. तर कधीकधी दुसऱ्यांच्या सुखातही आपले सुख असू शकते. कधी दुसऱ्याला खुश ठेवण्यातही सुख असते. तर कधी त्यागातही सुख असते. माधव आणि मिथिलाचे सुख कशात आहे? हे सांगणारी कथा म्हणजे 'सुख कळले'. हीच निःस्वार्थी, निर्मळ प्रेम कथा प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे २२ एप्रिलपासून आपल्या लाडक्या कलर्स मराठीवर. यापूर्वीच या मालिकेचे प्रोमो प्रेक्षकांच्या भेटीला आलेयत. त्यामुळे आता प्रतीक्षा लागली आहे ती माधव आणि मिथिलाच्या भेटीची. या मालिकेतील माधव -मिथिला म्हणजेच सागर देशमुख आणि स्पृहा जोशीने याआधीच प्रेक्षकांना आपलेसे केले आहे. त्यामुळे या नवीन जोडीची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहात असून केवळ प्रोमोवरही प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिक्रियांचा , त्यांच्या प्रेमाचा धुंवाधार वर्षाव होतोय. स्पृहा व सागरच्या ‘सुख कळले’ या नव्या मालिकेत अर्नवी खडसे, सुनील गोडबोले, स्वप्निल परजणे, अनिरुद्ध जोशी, स्वाती देवल, आरती वडगबाळकर, शशांक दर्णे, स्वराध्य देवल आणि स्वाती बोवलेकरसह अनेक कलाकार मंडळी पाहायला मिळणार आहेत. प्रत्येक घराला नि घरातल्या प्रत्येकाला आपली वाटणाऱ्या या मालिकेची कथा कलर्स मराठीचे प्रोग्रॅमिंग हेड आणि नाटक, मालिका, चित्रपट क्षेत्राचे आजचे आघाडीचे लेखक - दिग्दर्शक केदार शिंदे यांची असून त्या मालिकेची निर्मिती सोहम प्रॅाडक्शन्स यांनी केली आहे. तर सुचित्रा बांदेकर व सोहम बांदेकर या मालिकेचे खंदे निर्माते आहेत. तेव्हा आता रसिकहो, २२ एप्रिलपासून सोम ते शुक्रवार रात्री ९ वाजता फक्त कलर्स मराठीवर तुमच्या सर्वांच्या सुखासाठी…..“सुख कळले” साठी सज्ज व्हा!!!!

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.