डीडी फ्रि डिश टिव्हीच्या मराठी चॅनेल्समध्ये महत्त्वपूर्ण बदल; लवकरात लवकर सेट टॉप बॉक्स रिट्युन करुन घ्या
April 03, 2024
0
*डीडी फ्रि डिश टिव्हीच्या मराठी चॅनेल्समध्ये महत्त्वपूर्ण बदल; लवकरात लवकर सेट टॉप बॉक्स रिट्युन करुन घ्या*
*एप्रिलमध्ये डीडी फ्रि डिश टिव्हीच्या मराठी चॅनेल्समध्ये होणार महत्त्वपूर्ण बदल; काय बंद, काय चालू हे जाणून घ्या आणि लवकरात लवकर सेट टॉप बॉक्स रिट्युन करुन घ्या*
डीडी फ्रि डिश ग्राहकांसाठी महत्त्वाची सूचना अशी आहे की येत्या एप्रिलपासून शेमारु मराठी बाणा ग्राहकांना पाहता येणार नाही कारण शेमारु मराठी बाणा एप्रिल महिन्यापासून फ्रि डिशवरुन निरोप घेणार आहे. तर आता ‘सन मराठी’, ‘झी चित्रमंदिर’ आणि ‘फक्त मराठी’ या वाहिनी फ्रि डीश ग्राहकांच्या मनोरंजनासाठी तयार आहेत. नमूद केलेल्या ३ वाहिन्यांपैकी, ‘सन मराठी’ वाहिनीकडे उत्कृष्ट कंटेट आणि क्वालिटी आहे. इतर फ्रि डीश वाहिनी जुन्या मालिका, कार्यक्रम टेलिकास्ट करतात, वारंवार तेच दाखवतात पण ‘सन मराठी’कडे ओरिजनल आणि फ्रेश कंटेट असतो. सध्या त्यांच्या ९ नवीन मालिका प्रसारित होत आहेत तर हे नक्कीच बोलू शकतो की, प्रेक्षकांना शेमारुपेक्षा ‘सन मराठी’ वाहिनीवर मनोरंजनाचे पर्याय जास्त उपलब्ध आहेत.
तसेच ‘सन मराठी’ वाहिनीचा टीआरपी, रेटिंग्स जास्त आहे, मालिकेतून सादर केले जाणारे विषय नवीन आहेत, कलाकारांचा अभिनय उत्तम कथेच्या मार्फत अनुभवण्याची संधी मिळतेय. इतकंच नव्हे तर, लावणी आणि किर्तन या विषयांवर आधारित कार्यक्रम देखील दाखवले जातात आणि येत्या ७ एप्रिल रोजी ‘मटा सन्मान पुरस्कार सोहळा’ देखील ‘सन मराठी’वर प्रक्षेपित होणार आहे. या सर्व विविध कारणांमुळेच मराठी प्रेक्षकवर्ग ‘सन मराठी’ वाहिनीशी जोडला गेला आहे.
डीडी फ्रि डिश ग्राहकांना विनंती आहे की त्यांनी त्यांचा सेट टॉप बॉक्स २ एप्रिलला रिट्युन करुन घ्यावा आणि फ्रि डिशवर चॅनेल नंबर ६ वर पाहा आपली ‘सन मराठी’ वाहिनी.