अलिबाबा आणि चाळिशीतले चोर चे टीम चे मायबाप प्रेक्षकांना चित्रपटगृहात चित्रपट बघण्याचे केलें आवाहन
April 04, 2024
0
" अलिबाबा ---- " चे टीम कडून पायरसी विरोधात प्रेक्षकांना आवाहन
नितीन वैद्य प्रॉडक्शन्स प्रस्तुत, मृदगंध फिल्म्स एलएलपी निर्मित 'अलीबाबा आणि 'चाळिशी'तले चोर' नुकताच प्रदर्शित झाला असून प्रेक्षक त्यावर भरभरून प्रेम करत आहेत. चित्रपटाच्या यशाचा आनंद साजरा करत असतानाच या चित्रपटाच्या पायसरीबाबतची बातमी समोर आली आहे. चित्रपटाच्या संपूर्ण टीमकडून प्रेक्षकांना असे आवाहन करण्यात आले आहे की, आम्ही हे चित्रपट प्रेक्षकांसाठीच बनवतो. त्यामुळे कृपया चित्रपट सिनेमागृहात जाऊनच पाहा. एक कलाकृती सादर करण्यासाठी त्यामागे शेकडो लोकं काम करतात. मेहनत घेतात. अनेकांची घरे यावर चालतात आणि पायरसीमुळे सगळीच आर्थिक गणिते बिघडतात आणि याचा फटका सगळ्यांनाच बसतो. तसेच प्रेक्षकांनाही चित्रपटाचा खरा आनंद मिळत नाही. याबाबत चित्रपटातील सर्व कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून नाराजी व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रेक्षकांना नम्र विनंती आहे, पायरसी केलेली चित्रफित बघणे टाळा आणि चित्रपटगृहात जाऊनच चित्रपटाचा आनंद घ्या.