सुरु झाली आहे लगीनघाई, रणदिवेंच्या घरी येणार आहे जानकीची जाऊबाई
April 30, 2024
0
स्टार प्रवाहच्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेत ऐश्वर्या-सारंगच्या लग्नाची धामधूम
रणदिवे आणि विखेपाटील कुटुंबात सुरु आहे सारंग आणि ऐश्वर्याच्या लग्नाची धामधूम. खरतर दोन कुटुंबातलं वैर मिटावं म्हणून जानकी-ऋषिकेशने पुढाकार घेत ऐश्वर्या आणि सौमित्रच्या लग्नाचा घाट घातला. मात्र सौमित्रने अवंतिकासोबतच लग्न करण्याचं ठरवत ऐन लग्नाच्या धामधूमीत पळून जायचं ठरवलं. संतापलेल्या ऐश्वर्याला सौमित्रसोबतच लग्न करायचं आहे. त्यासाठी तिने सारंगशी लग्न करण्याचं ठरवत नवा डाव आखलाय. सौमित्रला किडनॅप करुन ऐन मांडवात सारंग ऐवजी सौमित्रसोबतच लग्न करण्याचा तिचा डाव आहे. ऐश्वर्याचा हा डाव यशस्वी होणार का? हे मालिकेच्या पुढील भागांमधून उलगडेल.
ऐश्वर्याचं लग्न सौमित्रसोबत होणार की सारंगसोबत याची उत्कंठा असली तरी विखेपाटील आणि रणदिवे कुटुंबात लग्नाची तयारी सुरु झालीय. हळद, मेहंदी, संगीत आणि लग्न सगळं काही अगदी साग्रसंगीत पार पडणार आहे. हळदीच्या कार्यक्रमासाठी खास पाहुणी म्हणून ठरलं तर मग मालिकेतली सायली येणार आहे. मेहंदी, संगीत आणि लग्नातही स्टार प्रवाह परिवारातले सदस्य खास हजेरी लावणार आहेत. तेव्हा पाहायला विसरु नका घरोघरी मातीच्या चुली मालिकेचा हळदी विशेष भाग सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.