Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

महेश कोठारे , " ओम फट स्वाहा " पुन्हा प्रेक्षकांना घाबरावयास येतोय

कोठारे पिता पुत्र पुन्हा घाबरवणार प्रेक्षकांना ओम फट स्वाहा !!! तो पुन्हा येतोय; झपाटलेला 3 चं पहिलं पोस्टर रिलीज
मुंबई : हिंदी फिल्म इंडस्ट्री प्रमाणेच मराठीफिल्म इंडस्ट्री मध्ये काही चित्रपट हे मैलाचा दगड ठरलेले आहेत . मराठी सिनेसृष्टीत असे काही सिनेमे आहेत ज्यांनी वर्षानुवर्षे प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. प्रेक्षकांमध्ये हे सिनेमे अजरामर झाले. असाच एक सिनेमा म्हणजे ‘झपाटलेला’. महेश कोठारे आणि लक्ष्मीकांत बेर्डे या जोडगोळीचा हा सिनेमा 1993 मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील तात्या विंचू हा बाहुला तुफान हिट झाला होता. आजही ‘ओम भग भुगे भग्नी भागोदरी, ओम फट स्वाहा…’ हे वाक्य ऐकलं तरी आपल्या डोळ्यासमोर तात्या विंचू उभा राहतो. या चित्रपटाला प्रदर्शित होऊन 30 वर्ष उलटले असले तरी आजच्या पिढीतही तात्या विंचूची क्रेझ कायम आहे. आता याच तात्या विंचूच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. हा तात्या विंचू प्रेक्षकांना भेडवण्यासाठी पुन्हा परततोय. काही वर्षांपूर्वी ‘झपाटलेला’ चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला आला होता, ज्यात आदिनाथ कोठारेसोबत अभिनेत्री सोनाली कुलकर्णी झळकली होती. पण या सिनेमाला प्रेक्षकांचा हवा तसा प्रतिसाद मिळाला नाही. पण त्यानंतर हा तात्या विंचू पुन्हा परतणार आहे. नुकतंच या चित्रपटाच्या तिसऱ्या भागाची घोषणा झाली आहे.
सोशल मीडिया वरून दिली माहिती स्वतःला अभिनयातील एक घटक म्हणून सिध्द केलेल्या अभिनेता आदिनाथ कोठारेने नुकतंच चाहत्यांना एक आनंदाची बातमी दिली आहे. अभिनेत्यानं ‘झपाटलेला 3’ या चित्रपटाची घोषणा केली आहे. त्यासोबतच या सिनेमाचं एक पोस्टरही समोर आलं आहे. ‘झपाटलेला 3’ या चित्रपटाची घोषणा करत आदिनाथनं लिहिलंय की, ‘Yes it’s true !!! हो खरंय !!! तात्या विंचू पुन्हा येतोय !!! 2025 चित्रपटगृहात ! 2025 in the theatres ! ओम फट स्वाहा !!!’ . आदिनाथची ही पोस्ट प्रचंड व्हायरल होत असून चाहते कमेंट्स करत आनंद व्यक्त करत आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.