'सन मराठी'च्या 'आदिशक्ती' या नवीन मालिकेत दिसणार सुयश टिळक आणि पल्लवी पाटील*
April 26, 2024
0
*'सन मराठी'च्या 'आदिशक्ती' या नवीन मालिकेत दिसणार सुयश टिळक आणि पल्लवी पाटील*
*लेकीच्या संरक्षणासाठी आईने केलेली प्रार्थना देवी ऐकणार आणि अवतरणार ‘आदिशक्ती’*
*आदिशक्तीची ताकद अनुभवा ‘सन मराठी’च्या ‘आदिशक्ती’ या नव्या मालिकेतून*
*६ मे पासून पाहा सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांचा काळ ठरणारी ‘आदिशक्ती’ फक्त ‘सन मराठी’वर*
“सज्जनांसाठी देवी आणि दुर्जनांसाठी काळ, सहज नाही लागणार ह्या आदिशक्तीचा ठाव”, असं म्हणत ‘सन मराठी’ने नुकताच ‘आदिशक्ती' मालिकेचा नवा प्रोमो रिलीज केला आहे, ज्यामध्ये अभिनेता सुयश टिळक महत्त्वाच्या भूमिकेत दिसतोय. कोण कोणाच्या विरोधात उभं राहिल, कोण कोणाचा शत्रु बनेल हे कधीच कोणी सांगू शकत नाही आणि वडीलांची शत्रु स्वत: त्यांची मुलगी असेल तर काय... भितीने थरकाप उडेल अशी घटना चिमुकल्या जीवाशी घडणार असेल तर आईचं काळीज घाबरणारच... पण आई लेकीच्या संरक्षणासाठी आदिशक्तीकडे प्रार्थना करणार आणि तिच्या पाठीशी उभी राहणार दैवी शक्ती, हे या प्रोमोमधून दाखवण्यात आले आहे.
रोमांचक, थरारक, कथेशी खिळवून ठेवणारी कथा घेऊन ‘सन मराठी’ वाहिनी नव्या पध्दतीने प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी पुन्हा सज्ज झाली आहे. दैवी शक्ती नेहमी चांगल्या कर्माच्या, माणसांच्या पाठीशी उभी असते हे या मालिकेतून अधोरेखित करण्यात आले आहे. तसेच सुयश टिळक, पल्लवी पाटील, सावी केळकर, अंबरिश देशपांडे, सुश्रुत आदी कलाकारांचा अभिनय अनुभवण्याची संधी प्रेक्षकांना मिळतेय. एकंदरीत ही नवी मालिका देखील प्रेक्षकांच्या घराघरांत आणि मनात हक्काचं स्थान निर्माण करणार हे नक्की.
नक्की पाहा ‘आदिशक्ती’ येत्या ६ मे पासून सोमवार ते शनिवार रात्री ८:३० वाजता फक्त सन मराठी वर.