Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

बनीने मारली आकाशला बाबा म्हणून हाक !

*बनीने मारली आकाशला बाबा म्हणून हाक !* 'पुन्हा कर्तव्य आहे' ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरताना दिसत आहे, वसूची सासू सुशीला काहीकरून वसूचं लग्न लावायचं ठरवते. इकडे जयश्रीपण मोहनकडे हट्ट धरते की काहीकरून आकाशला लग्नासाठी तयार करायचं. आकाश पुन्हा लग्न करायला तयार झालाय. एकीकडे सुशीला वसुकडून होकार मिळवायचा प्रयत्न करते. सुशीला वसूचा फोटो आकाशच्या घरी पाठवते. वसुंधराला मुलगा असल्याने आकाश सर्व प्रॉपर्टी त्या मुलाच्या नावावर करू शकतो आणि चिनू-मनू वर दुर्लक्ष होईल असं जयश्रीचा समज होतो ती एक अट घालते ह्या लग्नासाठी की वसूने भूतकाळचे सर्व पाश आणि तिचं अपत्य मागे ठेवूनच आकाशशी लग्न करावं. त्याच दरम्यान वसूचे फोटो आकाशच्या घरी पोहचतात. मंगल वसूच्या फोटो आकाशच्या खोलीत ठेवण्याचा बहाण्याने चिनू मनूला डिवचते की नवीन आई तुम्हाला घराबाहेर काढणार आहे. चिनू मनूच्या मनात भीती निर्माण होते आणि ते पाहून आकाश लग्न करण्याचा विचार मनातून काढून टाकतो. तिकडे वसूही बनीला वचन देते की लग्नाच्या स्वार्थी विचाराने ती त्याच्याकडे कधीच दुर्लक्ष करणार नाही. बनीला शाळेत आई बाबांवर निबंध लिहून आणायला सांगितल्याने तो वसूकडे हट्ट धरतो की बाबांची ओळख सांग. हे सर्व होत असताना बेबी काका आकाशचे फोटो घेऊन सुधीरकडे येतात. सुशीला आणि सुधीर आकाशचे फोटो नकळत वसूच्या खोलीत ठेवून देतात. ते फोटो बनीला सापडतात. आकाशचे फोटो बघून तो आकाशला स्वत:चे वडील म्हणून मान्य करतो. दुसरी दिवशी बनी भररस्त्यात आकाशला पाहून फोटोवले बाबा म्हणून हाक मारतो. आता काय होईल जेव्हा आकाश बनीची ही हाक ऐकेल? वसू बनीला कसं सांजवेळ ? कसं जडेल आकाश आणि वसूच नातं ? हे सर्व जाणून घेण्यासाठी पाहायला विसरू नका 'पुन्हा कर्तव्य आहे' रोज रात्री ९:३० वा. फक्त झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.