Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*माणसा माणसांत दडलेला विठ्ठल भेटायला येतोय 'विठ्ठला तूच' चित्रपटातून येत्या ३ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात*

*माणसा माणसांत दडलेला विठ्ठल भेटायला येतोय 'विठ्ठला तूच' चित्रपटातून येत्या ३ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात* *खऱ्याखुऱ्या विठ्ठलाची कथा 'विठ्ठला तूच' चित्रपटातून मोठ्या पडद्यावर पाहायला विसरू नका ३ मे पासून जवळच्या चित्रपटगृहात* सध्या मराठी सिनेसृष्टीत आशयघन चित्रपटांची चलती सुरू असलेली पाहायला मिळत आहे. एका मागोमाग एक मराठी चित्रपट बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालण्यात व्यस्त आहेत. अशा या चित्रपटांच्या रांगेत आता विठुरायाला साकड घालणारा तसेच विठुरायाची एक झलक पाहण्यासाठी सुरू असलेली धडपड आपल्याला मोठ्या पडद्यावर पाहायला मिळणार आहे. महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या पंढरपूरच्या विठुरायाला हाक देणारा 'विठ्ठला तूच' हा चित्रपट लवकरच म्हणजे येत्या ३ मे रोजी चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होण्यास सज्ज होत आहे.
आजकाल चित्रपटांमधील गाणी ही बरीच लोकप्रिय होतात. या चित्रपटातील 'विठ्ठला तूच तूच तू' या गाण्यालाही प्रेक्षकांनी भरपूर पसंती दर्शविली. आणि हे गाणं चर्चेत राहिलं. या चित्रपटातील या गाण्यानंतर आता संपूर्ण चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येण्यास सज्ज होत आहे. खरा विठ्ठल हा प्रत्येकात असतो आणि तो वेगवेगळ्या रूपात प्रत्येकाची मदत, प्रत्येकाची सेवा करत असतो याचं हुबेहूब उदाहरण म्हणजे हा चित्रपट आहे. आशयघन आणि रोमँटिक कथेची सांगड घालत हा चित्रपट मोठा पडदा गाजवणार आहे. 'वाय जे प्रॉडक्शन' निर्मित आणि दिग्दर्शक प्रफुल्ल म्हस्के दिग्दर्शित 'विठ्ठला तूच' हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटात नवोदित अभिनेता योगेश जम्मा आणि अभिनेत्री उषा बीबे मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहेत. भक्तीमय अशा चित्रपटात आशयघन अशा कथेची जोड असलेल्या हा चित्रपट एका वेगळ्या ढंगात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. यावेळी माणसा माणसांमध्ये दडलेल्या विठ्ठलाचे दर्शन कशाप्रकारे घडू शकत, हे या चित्रपटातून पाहायला मिळणार आहे. येत्या ३ मे २०२४ रोजी हा चित्रपट संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत असून चित्रपटाबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता निर्माण झालेली पाहायला मिळत आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.