Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

*‘संघर्षयोद्धा’ चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी -मनोज जरांगे पाटील*

*मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर तयार झालेला "संघर्षयोद्धा" मनोज जरांगे पाटील हा चित्रपट सेन्सॉर बोर्डने प्रदर्शनाच्या तोंडावर अडवला* *‘संघर्षयोद्धा’ चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी -मनोज जरांगे पाटील* *मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर बनलेला "संघर्षयोद्धा" चित्रपट सेन्सॉरच्या जाळ्यात अडकला* *२६ एप्रिल २०२४ ऐवजी आता २१ जून २०२४ला "संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील" चित्रपट होणार महाराष्ट्रभर प्रदर्शित* मनोज जरांगे पाटील हे नाव आपण बऱ्याच दिवसांपासून ऐकतोय , मराठा आरक्षणासाठी त्यांनी आपलं घरदार पणाला लावलं, ह्याच मनोज जरांगे पाटील यांच्या आयुष्यावर आता 'संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील' हा चित्रपट देखील येतोय , हा चित्रपट गेले ४ ते ५ महिन्यापासून राज्यभर चर्चेत आहे. हा चित्रपट २६ एप्रिल २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार होता , पण आता हा चित्रपट सेन्सॉर बोर्डने प्रदर्शनासाठी काही वेळेसाठी थांबवला आहे असं चित्रपटाचे लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे यांनी सांगितले आहे.
सध्या देशात चाललेली आचारसंहिता, मतदान या गोष्टीमुळे निवडणूक आयोगाने सेन्सॉर बोर्डला दिलेले नियम पाहून हा चित्रपट आचारसंहिते मध्ये प्रदर्शित करता येणार नाही असं सेन्सॉर बोर्ड ने सांगून हा चित्रपट प्रदर्शनासाठी काही दिवसांकरिता थांबवला आहे. चित्रपटाच्या टीमने अतिशय कष्ट करून सर्वांनी दिवसरात्र काम करून हा चित्रपट बनवला आहे , आता ऐन प्रदर्शनाच्या तोंडावर आमचा चित्रपट थांबवला ह्याच दुःख होत आहे , पण हा चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर मराठी चित्रपटसृष्टित सुपरहिट चित्रपट होणार असं चित्रपटात मनोज जरांगे पाटील यांची मध्यवर्ती भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील यांनी सांगितले आहे. हा चित्रपट प्रदर्शनापासून थांबवल्यामुळे राज्यभर तीव्र निषेध होतोय, हा चित्रपट आता येत्या २१ जून २०२४ ला संपूर्ण महाराष्ट्रात पूर्ण ताकदीने प्रदर्शित होईल असं दिग्दर्शक शिवाजी दोलताडे यांनी सांगितले आहे. सेन्सॉर बोर्ड ने "संघर्षयोद्धा" चित्रपट प्रदर्शनासाठी थांबवल्यावर चित्रपटाचे लेखक , निर्माते गोवर्धन दोलताडे , दिग्दर्शक शिवाजी दोलताडे ,मनोज जरांगे पाटील यांची भूमिका करणारे अभिनेते रोहन पाटील आणि सर्व टीमने अंतरवाली सराटी येथे ताबडतोब मनोज जरांगे पाटील यांची भेट घेऊन सर्व गोष्टी सांगितल्या. यावेळी मनोज जरांगे पाटील यांनी सांगितले की आपला "संघर्षयोद्धा" चित्रपट जरी सेन्सॉर बोर्ड ने थांबवला असला ,तरी २१ जून २०२४ या नव्या तारखेला मी चॅलेंज देऊन सांगतो की सगळा समाज, सगळा महाराष्ट्र हा चित्रपट बघेल ,त्याच बरोबर माझ्या ह्या चित्रपटाला शुभेच्छा आहेतच.‘संघर्षयोद्धा’ चित्रपट जाणून बुजून अडवण्याचा जर कोणी प्रयत्न करत असाल तर गाठ माझ्याशी आहे असं देखील मनोज जरांगे पाटील म्हणाले आहेत, मी लवकरच माझ्या वेळेनुसार पत्रकार परिषद घेऊन देखील चित्रपटा विषयी बोलेल त्याचबरोबर माझ्या ८ जून रोजी होणाऱ्या ९०० एकर सभेत देखील आपल्या २१ जून २०२४ला प्रदर्शित होणाऱ्या "संघर्षयोद्धा" या चित्रपटाविषयी प्रमोशन करा असे देखील मनोज जरांगे पाटील यांनी आवर्जून नमूद केले.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.