*कलर्स मराठीवर नव्या मालिकेचं होतंय आगमन; 'अबीर गुलाल' मालिकेचा प्रोमो रिलीझ*
April 30, 2024
0
*कलर्स मराठीवर नव्या मालिकेचं होतंय आगमन; 'अबीर गुलाल' मालिकेचा प्रोमो रिलीझ*
संपूर्ण महाराष्ट्राची लाडकी वाहिनी कलर्स मराठी आता नव्या रूपात हे वर्ष साजरे करायला सज्ज झालीय. या नवीन बदलाची सुरूवात ‘इंद्रायणी’ मालिकेद्वारे करण्यात आली .
कलर्स मराठी काही ना काही नवनवीन मनोरंजन प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येतच असते. नुकतेच 'सुख कळले' ही नवी मालिका आपल्या रसिकजनांना भेटायला आली.
'सुख कळले' ही मालिका प्रेक्षकांच्या चांगलीच पसंतीस उतरत असतानाच आता कलर्स मराठी आणखी एक नवी मालिका घेऊन आपल्यासमोर सज्ज झालीय. 'अबीर गुलाल' ,असे या नव्या मालिकेचे नाव असून नुकताच या मालिकेचा टिझर रिलीझ करण्यात आला आहे.
नियतीचे चक्र हे प्रत्येकाच्या नशिबात असतेच. हे चक्र कोणापासून अडलेले नाही. कधी कधी नियती असे डाव आपल्यासमोर टाकते की , त्या डावातून बाहेर पडणे प्रत्येकाला जमतेच असे नाही.
अशीच एक गोष्ट आपण या नव्या मालिकेत पाहणार आहोत. दोन अनोळखी मुलीची नशीबे एका रात्रीत बदलली. काय आहे या मुलींच्या नशिबात ? जाणून घेण्यासाठी पाहत राहा 'अबीर गुलाल'. या मालिकेचा टिझर तुम्ही कलर्स मराठीच्या अधिकृत यूट्यूब चॅनलवर पाहू शकता.
https://youtu.be/APhKcnhEvus?si=ZawP6EGCaofhLG0f
अबीर गुलाल या मालिकेत आता कोणती स्टारकास्ट असणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. त्याचप्रमाणे ही गोष्ट नेमकी काय असणार याची देखील अनेकांना उत्सुकता लागली आहे. मालिकेसंदर्भात अधिक जाणून घेण्यासाठी पाहत राहा कलर्स मराठी.