एजेच्या वाढदिवसाला लीलाच धमाका*
March 18, 2024
0
*एजेच्या वाढदिवसाला लीलाच धमाका*
झी मराठी वर नुकतीच सुरु झालेली मालिका 'नवरी मिळे हिटलरला' आपल्या पहिल्याच आठवड्यात खूप सारे ट्विस्ट आणि टर्न्स घेऊन आली आहे. एजे म्हणजेच अभिराम जहागिरदार यांचा वाढदिवस आहे. एजेच्या वाढदिवसाच्या दिवशी लिलाच्या घरून केक येण्याची परंपरा आहे. या वर्षी लिला स्वत: तिच्या आई सोबत केक घेऊन एजेच्या घरी येते. एजेच्या बर्थडे पार्टीमध्ये एजेच्या सुनांनी त्याच स्वयंवर आयेजित केलं आहे आणि हे कळल्यानंतर एजे भयंकर चिडतो. त्या रागाच्या भरात लिलाच्या आईला एजे वाट्टेल तसं बोलतो त्यावर लिलाही त्याच्यावर भडकते आणि भर पार्टीत ती एजेच्या तोंडावर केक फासते. लिलाच्या या कृतीमुळे तिच्या आईकडून तिला प्रचंड ओरडा पडतो. ती एजेकडून या केकचे पैसे वसूल करणार हे ठरवते. इकडे एजेची मेलेली बायको अंतरा त्याला प्रत्येक वाढदिवसाला एक लेटर पाठवत असते. या वर्षीच्या लेटरमध्ये तिने पुढच्या १५ दिवसात एजेला लग्न कर अशी अट घातली आहे.
त्याच्या सुना आता सासु शोधण्याच्या मोहीमेवर निघतात. लिला चुकुन या स्वयंवरात पोहोचते. आता लिला आणि एजे परत समोरा-समोर येणार तेव्हा काय होणार ? एजे शी घेतलेला पंगा लिलाला पडेल का भारी? काय होईल जेव्हा लिलाला कळेल की ती एजे च्या स्वयंवरात सहभागी झाली आहे?
हे सगळं पाहायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' मध्ये दररोज रात्री १० वा. फक्त झी मराठीवर.