झी मराठीवर आता आठवड्याचे सातही वार, मनोरंजन होणार जोरदार !
March 20, 2024
0
*झी मराठीवर आता आठवड्याचे सातही वार, मनोरंजन होणार जोरदार !*
रांधा वाढा उष्टी काढा आणि कधीही बोलू नका 'न' चा पाढा मुलांची शाळा, नवऱ्याचं ऑफिस, वीकएंड पिकनिकचा मुर्हत लागत नाही, घरातली भिशी पार्टी आता रंगत नाही, सहन होत नाही आणि सांगताही येत नाही मनोरंजनाचा हा वीकएंड उपवास, म्हणूनच झी मराठीने घेतला आहे रविवारचा ही ध्यास.
प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या मालिका झी मराठी वर आता आठवड्याचे सातही दिवस पाहायला मिळणार आहेत. झी मराठीची प्रत्येक मालिका तिच्या आकर्षक कथानकांमुळे आणि त्यात काम करणाऱ्या कलाकारांमुळे प्रेक्षकांच्या मनात घर करून आहेत .
आणि म्हणूनच आता प्रेक्षकांना त्यांच्या आवडत्या जोड्या, आवडते कलाकार आणि आवडत्या मालिका म्हणजेच 'अप्पी आमची कलेक्टर', 'पारू', 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ,'सारं काही तिच्यासाठी', 'शिवा', 'पुन्हा कर्तव्य आहे', नवरी मिळे हिटलरला' आणि 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' आता दररोज पाहायला मिळतील.
तेव्हा सोडा वीकएंड मनोरंजनाचा उपवास आता झी मराठीवर आठवड्याचे सातही वार, मनोरंजन होणार जोरदार.