Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

छोटीशी ओळख 'नवरी मिळे हिटलरला' कलाकारांशी*

*छोटीशी ओळख 'नवरी मिळे हिटलरला' कलाकारांशी* १८ मार्च पासून झी मराठी वर 'नवरी मिळे हिटलरला' ही नवीन मालिका प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. तुम्हा सर्वाना उत्सुकता लागली असेल कि कोण- कोण असणार आहे ह्या नव्या मालिकेत. तर ही छोटीशी ओळख 'नवरी मिळे हिटलरला' च्या कलाकारांशी आणि त्यांच्या व्यक्तीरेखांशी. *राकेश बापट* - साकारत आहे AJ ची म्हणजेच अभिराम जहागीरदारची भूमिका. जो डॅशिंग व्यक्तिमत्व , शिस्तबद्ध, वक्तशीरपणासाठी ओळखला जातो. ज्यामुळे त्याला "हिटलर" हे टोपणनाव मिळाले आहे. अभिरामच्या तीन सुना आहेत ज्या त्याच्यासाठी नवरी शोधण्या करिता सज्ज आहेत.
*वल्लरी विराज*- साकारत आहे लीला ची भूमिका. लीला बहिर्मुख आहे. सर्वांची मदत करणे हाच तिचा उद्देश असतो पण लीलाची लीला इतकी अपरंपार आहे की मदतीसाठी दिलेला हात काही तर घोळ घालून जातो. लीला जेव्हा अभिरामला भेटेल तेव्हा काय होणार हे बघण्याची मज्जाच वेगळी असणार. *शर्मिला शिंदे* - साकारत आहे जहागीरदार घराण्यातली मोठ्या सुनेची म्हणजेच दुर्गाची भूमिका . शर्मिलाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले,"दुर्गा मोठी सून असल्यामुळे आणि जहागीरदार घराण्यात सगळ्यात आधी आल्यामुळे तिचं अभिरामशी वेगळं नातं आहे. तिला अभिरामचा भूतकाळ माहितेय. दुर्गा शिस्तबद्द तर आहेच, पण तिन्ही सुनांमध्ये हुशार, जबाबदार आणि व्यावहारिक ही आहे."
*भुमीजा पाटील* - साकारत आहे धाकट्या सुनेची भूमिका म्हणजे सरस्वती जहागीरदारची भूमिका. भुमीजाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले, " सरस्वती ही खूप लाडावलेली आहे. अचानक शिस्तबद्ध घराण्यात तिचं लग्न झालाय. सरस्वतीच नवऱ्यावर अतिशय प्रेम आहे आणि तिला त्याच्यासाठी सगळ्या गोष्टी करायला आवडतायत पण तिला त्यागोष्टी करायला जमत नाहीये. तिच्या निष्पाप स्वभावामुळे ती कठीण परिस्थितीत ही असं काही बोलून जाते की ती परिस्थिती विनोदी होऊन जाते."
*सानिका काशीकर* - साकारत आहे मधल्या सुनेची म्हणजेच लक्ष्मीची भूमिका. सानिकाने आपल्या भूमिकेबद्दल बोलताना सांगितले, "लक्ष्मी ही एक धुर्त मुलगी आहे आणि तिला कळत कुठे काय बोलायचं आणि कसं वागायचं. ज्या घराण्यात तीच लग्न झालंय तिला त्याचा हेवा आहे. तिला असं वाटतं की घरात जे दुर्गाच स्थान आहे ते तिला मिळावं आणि त्यासाठी तिची खठपट सुरु आहे. अशी आहे थोडी धांदरट पण हुशार लक्ष्मी, जहागीरदाराची मधली सून."
*तेव्हा पाहायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला १८ मार्चपासून दररोज रात्री १० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.