१२ वर्षांचा असतानाच शाल्व किंजवडेकरला कसं मिळालं चॉकलेट बॉयच नाव
March 03, 2024
0
*१२ वर्षांचा असतानाच शाल्व किंजवडेकरला कसं मिळालं चॉकलेट बॉयच नाव*
आताच्या काही अभिनेत्यांनी खरंतर लहानपणापासूनच अभिनय आणि मॉडेलिंग क्षेत्रात काम करायला सुरुवात केली आणि आता इंडस्ट्रीत आपला ठसा उमटवत आहेत. त्यातलाच एक अभिनेता असा आहे ज्याने आपल्या पहिल्या कामाच्या मानधनाची हुशारीने गुंतवणूक केली आणि आता तो अभिनेता मराठी मालिकांमधील लाडका अभिनेता बनला आहे त्याचं नाव आहे शाल्व किंजवडेकर. शाल्वने आपल्या पहिल्या कामाबाबत आणि पहिल्या मिळालेल्या मंधानाबाबत सांगितले, "आयुष्यातलं पाहिलं काम वय वर्ष १२ होत तेव्हा मिळालं. मी एका थिएटर कंपनी सोबत काम करत होतो त्या कंपनीची एका चॉकलेटची जाहिरात होती त्यासाठी मी माझं नाव नोंदवलं आणि मला ती जाहिरात मिळाली. तर हे माझ्या आयुष्यातलं सर्वात पाहिलं काम होत. त्या जाहिरातीतून जे पैसे मिळाले होते तो माझा पहिला पगार होता आणि मी तो खर्च न करता त्याची गुंतवणूक केली होती." शाल्व सध्या झी मराठीच्या 'शिवा' या मालिकेमध्ये आशुतोषची भूमिका साकारत आहे.
बघायला विसरू नका 'शिवा' सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वा फक्त झी मराठीवर.