एन्व्हीच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी वरूण धवनची निवड
March 27, 2024
0
एन्व्हीच्या ब्रॅण्ड अॅम्बेसेडरपदी वरूण धवनची निवड
मुंबई, २७ मार्च २०२४: एन्व्ही या भारतातील आघाडीच्या प्रिमिअम फ्रॅग्रनन्स ब्रॅण्डने बॉलिवुड सेलिब्रिटी वरूण धवनची ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून निवड केली आहे. त्याचे साहसी व डायनॅमिक व्यक्तिमत्त्व आणि साहसी उत्साह ब्रॅण्डच्या 'लेट देम एन्व्ही' दृष्टिकोनातून दिसून येतात.
एन्व्ही त्यांच्या डिओडरण्ट्स आणि परर्फ्युम्ससह विशेष फ्रेंच फ्रॅग्रन्सेससाठी ओळखला जातो. एन्व्हीचा तरूणांचा आवडता ब्रॅण्ड म्हणून उपस्थिती वाढवण्याचा व प्रबळ करण्याचा मनसुबा आहे. ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून वरूण धवनची निवड त्यांच्या दीर्घकालीन विस्तारीकरण योजनेचा भाग आहे. या धोरणात्मक पुढाकाराच्या माध्यमातून एन्व्हीचा आपले ब्रॅण्ड प्रमोशन उपक्रम वाढवण्याचा उद्देश आहे. या सहयोगाचा भाग म्हणून वरूण धवन ब्रॅण्डच्या आगामी मल्टी-चॅनेल कॅम्पेन आणि विपणन उपक्रमांसह टीव्हीसी आणि सोशल मीडिया मोहिमांमध्ये पाहायला मिळणार आहे.
वरूण धवन युथ आयकॉन आहे आणि त्याची 'तडजोड न करणारी' वृत्ती एन्व्हीच्या डीएनएशी परिपूर्ण संलग्न आहे, ज्यामुळे तो ब्रॅण्ड अॅम्बेसेडर म्हणून अगदी योग्य आहे. त्याची स्टाइल आणि अविरत ऊर्जा एन्व्हीची उत्साहीपणाप्रती कटिबद्धता आणि ग्राहकांना अपवादात्मक फ्रॅग्रन्स प्रदान करण्याच्या मिशनशी पूरक आहे.
हॅमिल्टन सायन्सेस प्रा. लि.चे व्यवस्थापकीय संचालक श्री. सौरभ गुप्ता म्हणाले, ''एन्व्हीमध्ये आमचा विश्वास आहे की, फ्रॅग्रन्सेसचा व्यक्तीच्या आत्मविश्वासावर सकारात्मक प्रभाव पडू शकतो, ज्यामुळे इतरांना हेवा वाटू शकतो. वरूण धवन आमच्या ब्रॅण्डसाठी परिपूर्ण आहे, जेथे आमची उत्पादने तरूणांचे लक्ष वेधून घेतात. तर आजच्या तरूणांचे व त्यांच्या वृत्तींचे प्रतिनिधीत्व करण्यासाठी वरूणपेक्षा अधिक उत्तम कोण असेल. त्याची ऊर्जा, महत्त्वाकांक्षा आणि अविरत आत्मविश्वास आमच्या ब्रॅण्ड मूल्यांशी परिपूर्णपणे संलग्न आहेत. स्क्रिप्टसाठी हुशारी व वैविध्यतेची उत्तम भावना असलेल्या व्यक्तीची मागणी होती आणि वरूण ब्रॅण्डमध्ये गतीशीलता व ऊर्जा घेऊन येतो. आम्हाला विश्वास आहे की हा सहयोग गेम-चेंजर ठरेल आणि एन्व्हीला नव्या उंचीवर घेऊन जाईल.''
एन्व्ही व्यापक आरअँडडी प्रयत्नांचे पाठबळ असलेला आपला उत्पादन पोर्टफोलिओ विस्तारित करण्याप्रती कटिबद्ध आहे. आम्ही या वर्षामध्ये आमचा मार्केट शेअर दुप्पट करण्याप्रती उत्सुक आहोत. हॅमिल्टन सायन्सेस प्रा. लि. मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे आणि भारतीय ग्राहकांना उच्च दर्जाची उत्पादने प्रदान करण्याच्या एन्व्हीच्या दृष्टिकोनाला पाठिंबा देत आहे.
वरूण धवनसोबतच्या या सहयोगाच्या माध्यमातून ब्रॅण्डचा आपली ब्रॅण्ड दृश्यमानता व सहभागात्मक उपक्रम वाढवण्याचा मनसुबा आहे. तसेच, ब्रॅण्डचा विक्रीचा वाढवण्याचा, ग्राहकवर्ग विस्तारित करण्याचा आणि बाजारपेठेतील स्थिती दृढ करण्याचा देखील मनसुबा आहे.