Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

'चला हवा येऊ द्या' चा अलविदा, पुन्हा परत येण्याच्या वचनासोबत.

*'चला हवा येऊ द्या' चा अलविदा, पुन्हा परत येण्याच्या वचनासोबत.* इतिहास घडवला ज्यांनी, सलग १० वर्ष लोकांना हसवलं ज्यांनी, कसे आहात हसताय ना असं म्हणत फक्त महाराष्ट्रात नाही तर जगभरात लोकांचं मन जिंकलं तो लोकप्रिय कार्यक्रम 'चला हवा येऊ द्या' आणि ती लाडकी टीम आता १७ मार्चपासून विश्रांती घेतेय, पण परत येण्यासाठी. कारण गेली १० वर्ष प्रेक्षकांच्या मनात घर करून असलेल्या 'चला हवा येऊ द्या' या कार्यक्रमाचा शेवटचा भाग प्रसारित होणार आहे पण निराश होऊ नका कारण एका अल्पविरामानंतर हा कार्यक्रम तुमच्या त्याच लाडक्या टीमसोबत पुन्हा एकदा हसवायला आणि तुमचं मनोरंजन करायला सज्ज होणार आहे. या अखेरच्या भागात झी मराठी परिवारात दाखल झालेले आणि नव्याने दाखल होणाऱ्या मालिकांचे म्हणजेच 'पारू', 'शिवा', 'पुन्हा कर्तव्य आहे' आणि 'नवरी मिळे हिटलरला'चे प्रमुख कलाकार 'चला हवा येऊ द्या' च्या टीम सोबत आपल्याला मंचावर डान्स आणि विनोदाची अतिशबाजी करताना दिसणार आहेत.
'चला हवा येऊ द्या' ह्या रिऍलिटी शोबद्दल बोलताना झी मराठीच्या चीफ चॅनल ऑफिसर ‘व्ही.आर. हेमा’ म्हणाल्या, "चला हवा येऊ द्या ह्या कार्यक्रमाने मनोरंजनाचा स्तर एका वेगळ्या टप्यावर नेऊन ठेवला आहे. ह्या टीम मधल्या प्रत्येकानी लोकांच्या हृदयात आपलं घर निर्माण केले. वाहिनीसोबत असलेलं ह्यांचं नातं हे अलौकिक आहे. तुमच्या लाफ्टर डोसचा बुस्टर डोस घेऊन ही टीम तुमच्यासाठी नव्या जोमात परत येणारआहे". तेव्हा पाहायला विसरू नका मनोरंजनाने भरलेला 'चला हवा येऊ द्या'च्या ह्या पर्वाचा शेवटचा भाग रविवार १७ मार्च रात्री ९.३० वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.