महाराष्ट्रातल्या या तरूणाने समुद्रांवर सत्ता गाजवली आहे, त्याची अभूतपूर्व गाथा पाहा फक्त हिस्ट्रीटीव्ही१८वर
March 28, 2024
0
महाराष्ट्रातल्या या तरूणाने समुद्रांवर सत्ता गाजवली आहे, त्याची अभूतपूर्व गाथा पाहा फक्त हिस्ट्रीटीव्ही१८वर
प्रभातला इतिहास रचण्यासाठी कोणकोणत्या आव्हानांचा सामना करावा लागला ते पाहा या सोमवारी रात्री 8 वाजता 'ओएमजी! ये मेरा इंडिया' मध्ये फक्त हिस्ट्री टिव्ही 18 वर.
आपली चिकाटी आणि मेहनतीचे अद्भुत प्रदर्शन करून अलिबागच्या प्रभात कोळीने जलक्रीडा इतिहासात स्वतःचे नाव सुवर्णाक्षरांनी कोरले आहे. कोळीने वयाच्या फक्त २३ व्या वर्षी अत्यंत खडतर ओशियन्स सेव्हन आव्हान पार केले आहे. या कामगिरीमुळे त्याला २०२३ पर्यंत हा अत्यंत कठीण प्रवास पूर्ण करणारा जागतिक पातळीवरील सर्वाधिक तरूण खेळाडू म्हणून किताब मिळाला आहे. मानवी चिकाटी आणि दृढनिश्चय यांची अभूतपूर्व गाथा पाहा या सोमवार दिनांक १ एप्रिल रोजी रात्री ८ वाजता ओएमजी! ये मेरा इंडियामध्ये फक्त हिस्ट्रीटीव्ही१८वर. या आगळ्यावेगळ्या ओरिजिनल कथाबाह्य मनोरंजन मालिकेचा दहावा सीझन प्रेक्षकांचे मनोरंजन, प्रेरणा आणि आशा देण्याचे वचन पूर्ण करतो आहे. दर सोमवारी रात्री ८ वाजता अशा व्यक्तींच्या मनोरंजक, अद्भुत गोष्टी ज्यांनी आपल्या खास टॅलेंटद्वारे जगात क्रांती घडवून आणली आहे, त्यांचे सामाजिक प्रभाव उपक्रम, तांत्रिक नावीन्यपूर्णता, विक्रमी कार्य, त्यांच्या आगळ्यावेगळ्या आवडीनिवडी हे सर्व पाहता येईल.
गिर्यारोहकाच्या सेव्हन समिट्सशी संबंधित 'ओशियन्स सेव्हन' आव्हानात जगातील सर्वाधिक आव्हानात्मक सात खुल्या समुद्रातल्या पोहण्याचा समावेश आहे. त्यातून मानवी दृढनिश्चयाच्या मर्यादा तपासल्या जातात, खुल्या पाण्यातील दिशादर्शन आणि समुद्रातल्या अनपेक्षित घटकांचा सामना करण्याची क्षमता या सर्व गोष्टी शोधल्या जातील. कोळी याने २०१५ मध्ये या अद्भुत प्रवासाला सुरूवात केली. त्याने अनेक वर्ष कठोर परिश्रम, अतूट चिकाटी आणि प्रचंड शारीरिक व मानसिक शक्तीचा वापर करून हे साध्य केले आहे. प्रभात कोळीने ओशियन्स सेव्हन पार करणे हे त्याच्या पोहण्याच्या अद्वितीय कौशल्यावर तर प्रकाशझोत टाकतेच पण त्याचबरोबर वचनबद्धतेची ताकद आणि प्रचंड मोठे अडथळे पार करण्यासठी मानवी मनाची शक्ती यांचे प्रतीक आहे. या तरूण माणसाच्या पाण्याच्या प्रेमामुळे त्याला कशा प्रकारे तेनसिंग नोर्गे पारितोषिक आणि ३ वर्ल्ड रेकॉर्ड कसे मिळाले हे पाहा या सोमवारी रात्री ८ वाजता ‘ओएमजी! ये मेरा इंडिया’ वर!
या अलिबागच्या तरूण मुलाबद्दल अभिमान वाटून घ्या आणि त्यासोबत पाहा देशाच्या कानाकोपऱ्यातल्या अभूतपूर्व, अद्वितीय गोष्टी. बुंदेलखंडच्या महिला जल योद्ध्यांनाही पाहायला विसरू नका!
पाहत राहा ‘ओएमजी! ये मेरा इंडिया’ दर सोमवार रात्री ८ वाजता फक्त हिस्ट्रीटीव्ही१८ वर.