AJ च्या लग्नाच्या मागणीला, काय असेल लीलाच उत्तर?
March 31, 2024
0
*AJ च्या लग्नाच्या मागणीला, काय असेल लीलाच उत्तर?*
'नवरी मिळे हिटलरला' ही मालिका अगदी पहिल्या भागापासूनच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहे. AJ आणि लीला ची केमिस्ट्री प्रेक्षकांना आवडत आहे. येणाऱ्या आठवड्यात आपण पाहू शकणार आहोत, सीता रूपात लीला AJच्या घरी आली आहे आणि त्याचवेळेस विश्वरूपने लीलाचा अपमान करण्यासाठी मिडीयाच्या लोकांना घरी बोलवून ठेवलं आहे. दुर्गा लीलाच्या बाबांचा अपमान करते की तुम्ही हे सगळं मुद्दाम करताय तेव्हा लीला सांगते की मी लग्नासाठी नाही तर ऑडीशनला आले होते आणि या अंकल सोबत लग्न करायला कोण तयार होणार? इकडे एजेच्या आईला मात्र लीला पसंत पडलेय.
ती एजेला सांगते की लीला मध्ये तिला अंतरा दिसते. तर दुसरीकडे लीलाला धडा शिकवायचा म्हणून लक्ष्मी तिचा फोटो पेपरमध्ये छापते आणि तिचा बदनामी करण्याचा प्रयत्न करते. एजे लीलाच्या आई वडीलांची माफी मागायला घरी जातो. आणि त्याचवेळेस तो लीलाला लग्नाची ऑफर देतो. आता AJ च्या लग्नाच्या मागणीला, काय असेल लीलाच उत्तर? यासाठी पाहायला विसरू नका 'नवरी मिळे हिटलरला' दररोज रात्री १०:०० वा. फक्त झी मराठीवर.