‘कन्नी’ने साजरा केला व्हॅलेंटाईन डे
February 14, 2024
0
*‘कन्नी’ने साजरा केला व्हॅलेंटाईन डे*
मैत्री, प्रेम आणि स्वप्न यांचा मागोवा घेणाऱ्या ‘कन्नी’ चित्रपटातील कलाकारांनी आज व्हॅलेंटाईन डे मीडियासोबत गेट वे ॲाफ इंडिया येथे क्रुझवर साजरा केला. यानिमित्ताने ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर, अजिंक्य राऊत यांच्यासह निर्माते, दिग्दर्शकांनी पत्रकार मित्रांसोबत गाणी, नृत्य करत धमाल केली. मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणारा ‘कन्नी’ चित्रपट ८ मार्च रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सनी राजानी, अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर निर्मित या चित्रपटाचे दिग्दर्शन समीर जोशी यांनी केले आहे.