स्टार प्रवाहची नवी मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये दिसणार बालकलाकार आरोही सांबरे
February 14, 2024
0
स्टार प्रवाहची नवी मालिका ‘घरोघरी मातीच्या चुली’मध्ये दिसणार बालकलाकार आरोही सांबरे
स्टार प्रवाहवर १८ मार्चपासून सुरु होणाऱ्या घरोघरी मातीच्या चुली मालिकेची प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे. मालिकेच्या प्रोमोना भरभरुन प्रतिसाद मिळत असून मुख्य नायिका जानकीसोबत प्रोमोत दिसणारी छोटी मुलगी कोण आहे याविषयी देखिल प्रेक्षकांमध्ये कुतुहल आहे. प्रोमोत दिसणारी ही चिमुकली म्हणजेच बालकलाकार आरोही सांबरे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेत आरोही ओवीच्या भूमिकेत दिसेल. याआधी आरोही स्टार प्रवाहच्या मुलगी झाली हो, शुभविवाह आणि सुख म्हणजे नक्की काय असतं या मालिकेतून भेटीला आली आहे. आरोहीला अभिनयासोबतच नृत्याची आणि गाण्याची देखिल आवड आहे. यासोबतच आरोही बॉक्सिंग आणि कराटेचं देखिल प्रशिक्षण घेत आहे. घरोघरी मातीच्या चुली मालिकेतली ओवी व्यक्तिरेखा साकारण्यासाठी ती खुपच उत्सुक आहे.
मालिकेच्या नावातच मालिकेची खरी गोष्ट दडलेली आहे. घर म्हण्टलं तर छोट्या मोठ्या कुरबुरी या आल्याच. मात्र घराला खऱ्या अर्थाने घरपण मिळतं ते घरातल्या आपल्या माणसांमुळे. याच आपल्या माणसांची गोष्ट म्हणजे घरोघरी मातीच्या चुली. सविता प्रभुणे, रेश्मा शिंदे, प्रमोद पवार, उदय नेने, भक्ती देसाई, सुनील गोडसे अशी दिग्गज कलाकार मंडळी या मालिकेतून भेटीला येणार आहेत. स्टार प्रवाह प्रस्तुत या मालिकेची निर्मिती सुचित्रा आदेश बांदेकर यांच्या सोहम प्रोडक्शन्सने केली असून राहुल लिंगायत मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. तेव्हा पाहायला विसरु नका नवी मालिका घरोघरी मातीच्या चुली १८ मार्चपासून सायंकाळी ७.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.