Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

पूर्वा कौशिक आणि 'शिवा' ची अशी झाली भेट

*पूर्वा कौशिक आणि 'शिवा' ची अशी झाली भेट* झी मराठीची नवीन मालिका 'शिवा' लोकां मध्ये चर्चचा विषय बनलीआहे. शिवाचा लुक असो किंवा बिनधास्त स्वभाव लोकांना सगळंच आकर्षित करत आहे. तर आम्ही अभिनेत्री पूर्वा कौशिक हिच्याशी गप्पा मारल्या आणि तिच्या भूमिकेबद्दल जाणून घेण्याचा प्रयत्न केला. पूर्वाचे अभिनय क्षेत्रात कसे आणि कधी पदार्पण झाले हे व्यक्त करताना सांगितले, "मी CHM कॉलेज उल्हासनगरला शिकत असल्यापासूनच एकांकिका करत असल्यामुळे, राज्य नाट्य, कमर्शिअल नाटकं केली आणि त्यानंतर छोट्या पडद्यावर आले. थिएटर केल्यामुळे खूप गोष्टी वेगळ्याने जाणवल्या. मकरंद देशपांडे ह्यांच्या अंश ह्या थिएटर मध्ये मी काम करत होते. ह्यामध्ये सरांची ३ नाटकं मी केली . मी भरतनाट्यम मध्ये प्रशिक्षण घेतले आहे. शास्त्रीय नृत्यामध्ये मध्ये माझा डिप्लोमा झाला आहे. मला वाचनाची ही खूप आवड आहे.
मी पहिल्यांदा २०१० ला एक ऑडिशन दिली होती आणि मला ते काम माझ्या एका एकांकिकेमुळेच मिळालं होत. पण काही कारणास्तव ते प्रोजेक्ट मी करू शकले नाही. माझा पहिला शो ज्याच्यासाठी मी कॅमेरा फेस केला तो होता झी युवा चा 'फ्रेशर'. शिवाची भूमिका माझ्यापर्यंत काही अशी आली. मी काही महिन्यापासून कामाच्या शोधात होते आणि काम शोधत असताना ठरवले होते की नायिकेची भूमिका साकारायची. एक दिवस अचानक मला माझ्या सोशल मीडिया वर 'जगदंब प्रोडक्शन ' मधून मेसेज आला की 'तू ऑडिशनला येऊ शकशील का?' तेव्हा मी पहिला प्रश्न हाच विचारला नायिकेची भूमिका आहे का?' हो म्हटल्यानंतर तिथून गोष्टी घडत गेल्या आणि माझा 'शिवा' चा प्रवास सुरु झाला आम्ही खूप वर्कशॉप्स केले. त्यानंतर बरेच लुक टेस्टस केले अंदाजे २५ तरी कपडे ट्राय केले होत पण जेव्हा प्रोमो पाहिला तेव्हा सगळी मेहनत स्क्रीनवर पाहून मन संतुष्ट झालं. ह्या भूमिकेसाठी मी बाईक ही शिकली. माझ्याकडे ऍक्टिवा आहे पण बाईक चालवायला मी वर्कशॉप मध्ये शिकले. *आता मी आर.एक्स १०० बाईक चालवते जे तुम्हाला प्रोमो मध्ये आणि मालिके मध्ये ही पाहायला मिळेल.* जेव्हा माझी निवड झाली आणि वर्कशॉप सुरु झाले तेव्हा मी कोणालाच सांगितले नव्हतं. पहिला प्रोमो जेव्हा माझ्या कुटुंबाने आणि इंडस्ट्रीच्या मित्रानी पाहिला तेव्हा ते प्रचंड खुश झाले. खूप छान प्रतिसाद मिळाला मला प्रोमो पाहून. *'शिवा' सर्वाना भेटीला येतेय १२ फेब्रुवारी पासून सोमवार ते शनिवार रात्री ९:०० वाजता फक्त झी मराठीवर .*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.