केकेसीएलकडून किलरच्या डेनिमवेअरमधून यशस्वीपणे परिवर्तन झालेल्या परिपूर्ण युथ फॅशन ब्रॅण्डचे अनावरण*
February 21, 2024
0
*केकेसीएलकडून किलरच्या डेनिमवेअरमधून यशस्वीपणे परिवर्तन झालेल्या परिपूर्ण युथ फॅशन ब्रॅण्डचे अनावरण*
मुंबई २१ फेब्रुवारी २०२४: भारतातील प्रमुख ब्रॅन्डेड अॅपरल मॅन्युफॅक्चुरिंग समूह केवल किरण क्लोदिंग लिमिटेड (केकेसीएल) ने भारतभरातील रिटेलर्सना त्यांचा प्रमुख ब्रॅण्ड 'किलर' सादर केला आहे. तसेच आता डेनिम वेअर केंद्रित ब्रॅण्ड लक्षवेधक फॅशन ब्रॅण्डमध्ये बदलला आहे. सर्जनशील व लक्षवेधक प्रदर्शनामध्ये या परिवर्तनाला सादर करण्यासह आगामी एडब्ल्यू'२४ कलेक्शनमधील १००० हून अधिक उत्पादनांना दाखवण्यात आले, ज्यापैकी जवळपास ७५ टक्के टॉप-वेअर उत्पादने आहेत आणि त्यांनतर जवळपास २० टक्के बॉटम-वेअर उत्पादने आहेत. उर्वरित उत्पादनांमध्ये फूटवेअर, अंडरगारमेंट्स आणि अनेक अॅक्सेसरीजचा समावेश आहे.
किलरची ऑटम-विंटर २०२४ श्रेणी आजच्या उत्साही व डायनॅमिक तरूणांसाठी परिपूर्ण फॅशन वॉर्डरोब सोल्यूशन देते. भारतातील सर्वात मोठ्या स्वदेशी उत्पादन सुविधेच्या क्षमतांचा फायदा घेत किलर आगामी ऑटम-विंटर'२४ कलेक्शनमधील 'ऑप्टिमिझम' थीमअंतर्गत गारमेंट्सची लक्षवेधक श्रेणी सादर करण्यास सज्ज आहे.
हे कलेक्शन प्रथम व द्वितीय श्रेणीच्या शहरांमधील बाजारपेठांसह ३५० एक्सक्लुसिव्ह स्टोअर्स, १८०० हून अधिक एमबीओ आणि ८०० डिपार्टमेंटल स्टोअर्समध्ये उपलब्ध असेल. बारकाईने डिझाइन करण्यात आलेल्या प्रत्येक पीसमधून किलरची कारागिरी व नाविन्यतेप्रती अविरत समर्पितता दिसून येते, तसेच प्रिमिअम फॅब्रिक्सची निवड आणि अत्याधुनिक डिझाइन घटकांची खात्री मिळते.
या विकासाबाबत मत व्यक्त करत केवल किरण क्लोदिंग लिमिटेडचे संयुक्त व्यवस्थापकीय संचालक श्री. हेमंत जैन म्हणाले, ''अलिकडील वर्षांमध्ये आमची कंपनी भारतातील फॅशन बाजारपेठेच्या विकासाचा पुरेपूर फायदा घेण्यासाठी प्रबळ ठरली आहे आणि आम्ही आमच्या क्षमतांचा फायदा घेत जगभरातील फॅशन बाजारपेठांमध्ये प्रवेश करतो. आज आमचा प्रमुख ब्रॅण्ड किलरच्या इव्हेण्टला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद माझ्यासाठी अभिमानास्पद व समाधानकारक आहे, तसेच भारतीय तरूणांमध्ये ब्रॅण्डची लोकप्रियता अधिक वाढत आहे. किलर आता पूर्णत: युथ फॅशन ब्रॅण्डमध्ये रूपांतरित झाला आहे.''
विशेषत: स्वयं-अभिव्यक्तीला प्राधान्य देणारे फॅशनप्रेमी 'एजी' आणि 'फॅशन फॉरवर्ड लुक्स'चा समावेश असलेल्या मेन्स डिझाइन्सच्या श्रेणीची अपेक्षा करू शकतात. यासंदर्भात ताज, विवांता, दिल्ली येथे ब्रॅण्डने आयोजित केलेल्या विशेष ट्रेड शोची नाविन्यपूर्ण थीम होती - 'फ्यूजन ऑफ क्रिएटिव्हीटी अँड डिस्ट्रक्शन'. डिकन्स्ट्रक्शनमधून नाविन्यपूर्ण बाबी निर्माण होतात या तत्त्वाला अंगिकारत ब्रॅण्डने डेनिम आर्टच्या प्रदर्शनीय इन्स्टॉलेशनच्या माध्यमातून या संकल्पनेला सादर केले. ही कलाकृती पूर्णत: नवीन व नाविन्यपूर्ण अनुभवांची निर्मिती करण्यासाठी समकालीन मर्यादांना दूर करणारी उदाहरण ठरली. सर्जनशीलतेच्या युगात डिस्ट्रक्शनकडे नकारात्मक दृष्टिकोनाने न पाहता नाविन्यतेसाठी महत्त्वपूर्ण बाब म्हणून पाहिले जाऊ शकते. हा दृष्टिकोन आव्हानांना विकास व नवीन शोधासाठी संधी म्हणून अवलंबले जाऊ शकण्याच्या मानसिकतेला प्रेरित करतो.
श्री. हेमंत जैन पुढे म्हणाले, ''या वर्षात किलरकडून अनेक लॉन्चेस पाहायला मिळतील. अविरत कटिबद्धतेसह आम्ही आता आमची प्रमुख मालमत्ता किलरला नव्या उंचीवर नेण्यासह ऑप्टिमाइज करण्याच्या दिशेने वाटचाल करत आहोत, तसेच हा ब्रॅण्ड सर्वोच्च कामगिरी करण्यासह फॅशन उद्योगामध्ये नवीन बेंचमार्क्स स्थापित करत राहण्याची खात्री घेत आहोत. आमच्या सर्व वैविध्यपूर्ण ग्राहक टचपॉइण्ट्समध्ये किलरचा नवीन लुक पाहायला मिळेल, तसेच सुधारित ब्रॅण्ड अनुभव मिळेल, ज्यामुळे ग्राहकांना सोईस्करपणे पूर्णत: नवीन फॅशन लुक्सचा अनुभव घेता येईल.''