पिक्चर अजून बाकी आहे... 'जाऊ बाई गावात'*
February 16, 2024
0
*पिक्चर अजून बाकी आहे... 'जाऊ बाई गावात'*
झी मराठी घेऊन येत आहे आता पर्यंतचा सर्वात मनोरंजक पिक्चर. ग्लॅमर, स्टाईल, प्रेम,कॉमेडी थ्रिल, एकसाइटमेंट, ऍक्शन ड्रमा, जबरदस्त डांस, गाणी आणि मोठमोठे कलाकार ह्या पिक्चर मध्ये सगळंच आहे. हा मराठी टेलिव्हिजन वरचा सर्वात मोठा पिक्चर आहे. 'जाऊ बाई गावातचा' पूर्ण प्रवास तुम्हाला एकत्र पाहता येणार आहे १८ फेब्रुवारीला. हो हे खरं आहे, हार्दिकच सूत्रसंचालन, स्पर्धकांचा पूर्ण प्रवास, खास पाहूण्यांची मज्जा मस्ती, आणि मजेदार टास्क, गावकऱ्यांच्या गमतीजमती तुमचा रविवार रंगतदार बनवणार आहे. जर तुम्ही एकजरी एपिसोड मिस केला असाल तर ह्या रविवारी तुमच्यासाठी ही खास संधी आहे. 'जाऊ बाई गावातच्या' पहिल्या पर्वाच्या यशाचा प्रवास कसा होता हे तुम्हाला एकत्र पाहायला मिळणार आहे. तर घरातल्या सर्व मंडळींना गोळा करा आणि पॉपकॉर्न घेऊन टीव्ही वर कधी न पाहिलेला पिक्चर पाहायला नक्की या *१८ फेब्रुवारी संध्या ७:०० वा.* फक्त आपल्या झी मराठीवर.