Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

हँडसम राकेश बापटची झी मराठीवर धमाकेदार एन्ट्री

*हँडसम राकेश बापटची झी मराठीवर धमाकेदार एन्ट्री* *नजरेत धार.. शिस्त ह्याची फार.. येतोय अभिराम जहागीरदार !*
प्रेक्षकांच्या हृदयाचे ठोके वाढवणार, कारण हिंदी मालिका आणि मराठी चित्रपटातला हँडसम चेहेरा *'राकेश बापट'* लवकरच *'नवरी मिळे हिटलरला'* ह्या नवीन मालिकेतून झी मराठीवर पदार्पण करणार आहे. *ह्या मालिकेच्या निमित्ताने राकेश बापट प्रथमच एका मराठी डेलीसोप दिसणार आहे.* प्रेक्षकांनी टिझर मध्ये पाहिलंच असेल राकेश, *AJ ची म्हणजेच अभिराम जहागीरदारची भूमिका साकारणार आहे*. AJ ओळखला जातो तो म्हणजे मिस्टर परफेक्टशनिस्ट, ज्याचं व्यक्तिमत्व आहे डॅशिंग, अतिशय शिस्तबद्ध, आणि वक्तशीरपणामुळे. ज्यामुळे त्याला "हिटलर" हे टोपणनाव मिळाले आहे.
AJ साठी नवरी शोधण्याची मोहीम त्याच्या सुनांनी सुरु केली आहे. प्रेक्षकांना लवकरच कळेल की कोण आहे हिटलरची नवरी. *'नवरी मिळे हिटलरला' या मालिकेचे लेखन केलं आहे सायली केदार हिने, तर चंद्रकांत गायकवाड मालिकेचं दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेची निर्मिती केली आहे शर्मिष्ठा राऊत आणि तेजस देसाई यांच्या एरिकॉन टेलिफिल्म्सने. याच निर्मितीसंस्थेची 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ही मालिका सध्या झी मराठीवर गाजत आहे. तेव्हा हिटलर येतोय तुम्हाला भेटायला लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.