Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

८ वे सहयोग कन्टेम्पररी आर्ट एक्झिबिशन - अनेक पिढ्यांचे कलाप्रदर्शन

८ वे सहयोग कन्टेम्पररी आर्ट एक्झिबिशन - अनेक पिढ्यांचे कलाप्रदर्शन आठव्या सहयोग कन्टेम्पररी आर्ट एक्झिबिशन मध्ये 16 वर्षे ते 80 वर्षे वयोगटातील कलाकारांना एकत्र आणले आहे. देशभरातील 30 कलाकारांच्या 75 हून अधिक कलाकृती प्रदर्शनात असतील. दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा सामाजिक कार्यासाठी सहकार्य करणे हा उद्देश सुद्धा या प्रदर्शनातून साध्य होणार आहे.प्रदर्शनातून होणाऱ्या विक्रीचा काही भाग ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी दिला जाईल. प्रतिष्ठित सहयोग कन्टेम्पररी आर्ट एक्झिबिशन आपल्या आठव्या प्रदर्शनासाठी शहरात सज्ज झाले असून यात देशातील 30 प्रतिभावान कलाकारांच्या 75 पेक्षा जास्त मोहक कलाकृती असणार आहेत. सुप्रसिद्ध कलाकार सत्येंद्र राणे द्वारा आयोजित आणि कलाकार नम्या गुप्ता यांच्या द्वारा सहआयोजित या प्रदर्शनात या वर्षी दिग्गज आणि नवोदित .कलाकारांच्या कलाकृतींचा समावेश असेल . 13 ते 19 फेब्रुवारी 2024 दरम्यान सुप्रसिद्ध अशा नेहरू सेंटर आर्ट गॅलरी, वरळी येथे आयोजित करण्यात आलेल्या या प्रदर्शनात स्थापत्य, अमूर्त, लँडस्केप, कन्टेम्पररी , मोज़ेक, मिक्स मीडिया आणि पेंटिंग्जमधील पोट्रेट्स यासह विविध कलाकृतींचा समावेश असेल.येथे काही शिल्पं सुद्धा असणार आहेत. प्रदर्शनातील विक्रीतून मिळालेल्या रकमेचा काही भाग ग्रामीण भागातील मुलांच्या शिक्षणासाठी एनजीओ अलर्ट सिटीझन फोरमकडे दिला जाईल.
'सहयोग ' ने उदयोन्मुख कलाकारांना प्रस्थापित कलाकारांसोबत त्यांचे काम दाखवण्यासाठी , व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी नाव कमावले आहे. यावर्षीच्या प्रदर्शनात ज्येष्ठ नागरिकांच्या कलाकृती देखील असणार आहेत. त्यामुळे यातून सर्व समावेशकतेचा एक स्तर पुढे जाणार आहे. "यावर्षीच्या आमच्या प्रदर्शनात एक नवीन पैलू दाखवताना मला आनंद होत आहे कारण या प्रदर्शनात प्रस्थापित आणि उदयोन्मुख कलाकारांसोबत ज्येष्ठ नागरिकांच्या सुंदर कलाकृतींचा समावेश आहे. या गटातील जिद्दीच्या विविधतेचे साक्षीदार होणे खरोखरच हृदयस्पर्शी आहे. शिक्षण क्षेत्रासाठी वाहून घेतलेला शिक्षकापासून ते अगदी एखाद्या हॉस्पिटलच्या मालकापर्यंत अशा या व्यक्ती ज्यांना पेंटिंग मधून रोज सकाळी दिलासा मिळत असतो , जे एकाकीपणाचा सामना करण्यासाठी कलेचा वापर माध्यम म्हणून करतात ,यांचे काम देखील कुठल्याही व्यावसायिकांपेक्षा कमी नाही ," सत्येंद्र राणे म्हणाले. ८ व्या सहयोग कन्टेम्पररी आर्ट एक्झिबिशनमध्ये संपूर्ण भारतातून (मुंबई ,पुणे ,नागपूर ,हैद्राबाद, बंगलोर) आणि नेपाळमधून कलाकार सहभागी होणार आहेत. सहभागी व्यक्तींमध्ये अर्पितो गोप, मधुमिता बसू, पूनम फर्नांडिस, स्नेहा निकम, कमल अहमद, भारती ढवळे, ऋषिका जलान, सत्येंद्र डी राणे, नंदिता देसाई, दिप्ती देसाई, विभा शर्मा, रेवती शिवकुमार, अद्योत राजाध्यक्ष, वैशाली कानडे, विरेश एस पटाली, उषा आर छावड़ा , साजिया आर अन्सारी, तानिया, विधी दोशी, शैलजा एस कामत, नम्या गुप्ता, अंतरा तिब्रेवाल, प्रशांत जाधव, कासिम कनासावी, अनुपमा मांडवकर, राम अवस्थी, जय नानावटी, आध्या शिवकुमार, सुमंत शेट्टी आणि स्मिता राणे हे असणार आहेत.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.