Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

प्रेमाच्या परीक्षेत मिळेल का अधिपतीला अक्षराची साथ

*प्रेमाच्या परीक्षेत मिळेल का अधिपतीला अक्षराची साथ* *अधिपती- अक्षराची प्रेमाची शाळा* ‘तुला शिकवीन चांगलाच धडा’ ही मालिका प्रेक्षकांच्या भलतीच पसंतीस पडत आहे. आणि आता तर मालिकेत आणखी मज्जा येणार आहे कारण 'अक्षराच्या प्रेमात अधिपतीने पाठीला दप्तर आणि अंगावर शाळेचा युनिफॉर्म घालून वर्गात प्रवेश घेतला आहे. अधिपतीला शाळेतल्या कपड्यां मध्ये पाहून अक्षराची बोलतीच बंद होते. अक्षरा वर्ग सोडून जायला निघते पण तितक्यात अधिपती असं काही बोलतो ज्यांनी तिचे पाऊल परत मागे फिरतात. भुवनेश्वरीने म्हणजेच आईने घातलेल्या अटीमुळे अधिपतीकडे काही पर्याय नव्हता पण मास्तरीणबाईंवर असलेल्या प्रेमाखातर त्याला युनिफॉर्म आणि दप्तरची साथ घ्यावी लागली कारण अक्षराची मनधरणी करायची आहे.
म्हणतात ना प्रेमाच्या लढाईत सगळंच माफ असतं आणि म्हणूनच अधिपतीने शाळेत जाण्याचा निर्णय घेतलाय. ज्यायोगे अक्षरा त्याला शाळेत तरी टाळू शकणार नाही. आता *ह्या प्रेमाच्या परीक्षेत अधिपती पास होईल का? अक्षरा त्याला प्रेमाचे धडे आणि माफी देईल का? भुवनेश्वरीला अधिपतीच्या शाळाप्रवेशाबाबत बातमी कळल्यावर काय होईल? हे सर्व तुम्हाला येणाऱ्या भागात पाहायला मिळेल. तेव्हा पाहायला विसरू नका अधिपती-अक्षराची प्रेमाची शाळा 'तुला शिकवीन चांगलाच धडा' मध्ये सोमवार ते शनिवार रात्री ८:०० वा फक्त झी मराठीवर.*

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.