एका अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगणार ‘कन्नी’*
February 15, 2024
0
*एका अनोख्या मैत्रीची गोष्ट सांगणार ‘कन्नी’*
मल्हार पिक्चर्स कंपनी प्रस्तुत, नॉटी पेंग्विन्स एंटरटेनमेंट्स आणि बियाँड इमॅजिनेशन फिल्म्स प्रॉडक्शन निर्मित, क्रोम फिल्म्स लिमिटेडच्या सहकार्याने प्रदर्शित होणारा ‘कन्नी’ चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अमित भरगड, गगन मेश्राम, वैभव भोर, सनी राजानी निर्मित, समीर जोशी दिग्दर्शित ‘कन्नी’ या चित्रपटाचा उत्सुकता वाढवणारा टिझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. वडिलांचे स्वप्न पूर्ण करणाऱ्या ऋता परदेशात नोकरी करून तिचे आयुष्य सुखकर करायचे आहे. यासाठी तिला तिच्या मित्रांची साथ हवी आहे. परंतु या सगळ्यात तिचे मित्र तिला साथ देणार का तिचे हे स्वप्न अधुरे राहून तिला तिच्या मायदेशी परतावे लागणार, याचे उत्तर प्रेक्षकांना ८ मार्चला मिळणार आहे.
टिझरवरून हा चित्रपट मनोरंजनाचे परिपूर्ण पॅकेज असल्याचे दिसतेय. यात प्रेम, मैत्री, स्वप्नांचा मागोवा घेणाऱ्या कथेला विनोदाची आणि भावनांचीही जोड आहे.
‘कन्नी’चे लेखनही समीर जोशी यांचे असून यात ऋता दुर्गुळे, शुभंकर तावडे, वल्लरी विराज, ऋषी मनोहर आणि अजिंक्य राऊत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
दिग्दर्शक समीर जोशी म्हणतात, " आयुष्यात प्रत्येकाचे काहीतरी स्वप्न असते. आपल्या स्वप्नांसोबत उंच भरारी घेण्यासाठी प्रत्येक जण प्रयत्नात असतो. ‘कन्नी’मधील कल्याणीही तशीच आहे. कल्याणी ही आपल्या आजुबाजुला वावरणाऱ्या सर्वसामान्य मुलीसारखी आहे. म्हणूनच ही कथा प्रेक्षकांना आपल्या जवळची वाटेल. हा एक कौटुंबिक सिनेमा आहे. जो प्रत्येकाने आपल्या कटुंबासोबतच पाहावा.’’