केवल किरण क्लोदिंग लिमिटेडने नेटफ्लिक्सची वेब सिरीज 'किलर सूप'विरुद्ध कायदेशीर कारवाई केली*
January 21, 2024
0
*केवल किरण क्लोदिंग लिमिटेडने नेटफ्लिक्सची वेब सिरीज 'किलर सूप'विरुद्ध कायदेशीर कारवाई केली*
मुंबई, २1 जानेवारी २०२४: 'किलर जीन्स' ची उत्पादक कंपनी केवल किरण क्लोदिंग लिमिटेडने 'किलर सूप' या वेब सिरीजच्या निर्मात्यांविरुद्ध ट्रेडमार्क 'किलर'चे उल्लंघन केल्याबद्दल मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला आहे. केकेसीएलने मॅकगफिन पिक्चर्स एलएलपी आणि नेटफ्लिक्स एंटरटेन्मेंट सर्विसेस इंडिया एलएलपी या निर्मात्यांना दाव्यामध्ये प्रतिवादी म्हणून आरोप केले आहे. नेटफ्लिक्सने ११ जानेवारी २०२४ रोजी आपल्या प्लॅटफॉर्मवर मनोज बाजपेयी आणि कोंकणा सेन शर्मा अभिनीत वेब सिरीज 'किलर सूप' रिलीज केली. केकेसीएलने नेटफ्लिक्सच्या या सिरीजच्या नावाचा भाग म्हणून त्यांच्या
ट्रेड मार्कचा वापर करण्यावर तीव्र आक्षेप घेतला आहे.