‘पारू’ सोबत सातारकरांची मकरसंक्रांत
January 16, 2024
0
*‘पारू’ सोबत सातारकरांची मकरसंक्रांत*
झी मराठी आपल्या प्रेक्षकांसाठी घेऊन येतेय एक नवा कार्यक्रम,“पारू”. ही गोष्ट आहे, गावातून पहिल्यांदाच मोठ्या शहरात आलेल्या पारूची. कित्येक वर्ष आपल्या वडिलांच्या पासून लांब राहिल्यानंतर आता वडिलां सोबत राहायला शहरात आलेली पारू. गावावरून शहरात येताना पारू आपल्यासोबत गावाकडच निरागसपणा घेऊन आलीये, ती तिच्याबरोबर तिचा निसर्ग घेऊन आलीये. यात नटखट अवखळ निष्पाप पारूची भूमिका साकारणार आहे 'शरयू सोनावणे'.
‘पारू’ आणि ‘शिवाचा’ नवीन प्रवास सुरु होतोय आणि त्यात दोघीना मोठ्यांचे आशीर्वाद आणि लहानांच प्रेम मिळालं ह्याहून छान सुरुवात काय असू शकते. मकरसंक्रांतीच्या निमित्ताने 'पारू' पोहोचली सातारला आपल्या मैत्रिणींसोबत संक्रांत साजरी करायला. गावातल्या बायकांनी पारूचे स्वागत केले.
तिला हळदी-कुंकू लावून तिचा सम्मान केला, पारूही रिकाम्या हाती आली नव्हती तर तिने बनवलेले तिळगुळ घेऊन आली होती. तिळगुळ वाटून झाल्यावर पारूने छोट्या मित्रांसोबत पतंग उडवले, त्या छोट्या मित्रांनी पारूसाठी एक भेट तयार केली होती जी त्यांनी स्वतःच्या हातानी बनवली होती. पारू ह्या अनमोल क्षणांचा साठा घेऊन आपल्या नवीन वाटचालीवर निघाली आहे.
प्रेक्षकांच मनोरंजन करायला सज्ज असलेली “पारू” येतेय लवकरच फक्त आपल्या झी मराठीवर.