Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

दुसरे नानासाहेब पेशवे ह्यांच्या ब्रिटीशांसोबतच्या नात्यामधील बदलांचा उलगडा करणार

हिस्टरी हंटरच्या' पुढच्या भागामध्ये मनीष पॉल सर्वाधिक हवे असलेले अपराधी बनण्याच्या संदर्भात दुसरे नानासाहेब पेशवे ह्यांच्या ब्रिटीशांसोबतच्या नात्यामधील बदलांचा उलगडा करणार हिस्टरी हंटरच्या’ अंतिम भागामध्ये भारतातील सर्वाधिक हवे असलेले स्वातंत्र्य सैनिक आणि 'कानपूरचे कसाई' म्हणून ओळखल्या गेलेल्या दुस-या नानासाहेब पेशव्यांची कहाणी उलगडणार 8 वा एपिसोड 8 जानेवारी रोजी रात्री 9 वाजता डिस्कव्हरी चॅनलवर आणि डिस्कव्हरी+ वर प्रसारित होणार प्रेक्षक 'हिस्टरी हंटरच्या' थरारक अंतिम भागाची वाट बघत आहेत ज्यामध्ये मनीष पॉल सध्याच्या सीजनमधील सर्वांत शेवटचा शोध घेणार आहे व 1857 च्या विस्मृतीत गेलेल्या दुस-या नानासाहेब पेशव्यांच्या रहस्यावर प्रकाश टाकणार आहे. ब्रिटीश सरकारचे मित्र म्हणून सुरूवात केलेल्या नानासाहेब पेशव्यांना त्यांचे वडील दुसरे बाजीराव पेशवे ह्यांच्या निधनानंतर पेन्शन आणि जहागीर मिळाली नाही, तेव्हा दु:ख झाले. ह्या परिस्थितीमध्ये त्यांनी ब्रिटीशांच्या विरोधात कारवाई केली व त्यामधून इतिहासामध्ये प्रसिद्ध झालेली कानपूर कत्तल घडली.
प्रेक्षकांना बघायला मिळेल की, कशा प्रकारे नानासाहेबांनी मुत्सद्देगिरी दाखवून ब्रिटीशांना समझौता करण्याच्या बहाण्याने त्यांना सत्ती चौरा घाटामध्ये एकत्र आणले व तेव्हा त्यांच्यावर अचानक हल्ला चढवून 400 पेक्षा जास्त नागरिकांना ठार मारले. नानासाहेबांची मूळ योजना ब्रिटीश सेनेला मदत करण्याची होती, पण बंडखोरांनी त्यांचे प्राण हरण करण्याची धमकी त्यांना दिली होती, असेही काही जणांचे मत आहे. मुघल राजघराण्याच्या नौलखा हाराचे महत्त्व अधोरेखित करणा-या ह्या भागामध्ये दुस-या नानासाहेब पेशव्यांनी लपून जाण्याची योजना कशी आखली, हेही बघायला मिळेल. ह्या हारामुळे त्यांना नेपालमध्ये प्रवेश करता आला. आजच्या काळात रू. 1400 कोटींहून अधिक इतक्या रकमेचा त्यांचा खजिना ब्रिटीशांना मिळाला असला तरी ब्रिटीश सेना कधीही नानासाहेबांना पकडू शकली नाही. नानासाहेब पेशव्यांचे अखेरचे दिवस कसे गेले, हे आजही गूढ आहे. काही विशेषज्ञांनी म्हंटले की, त्यांचा मृत्यु मलेरियामुळे झाला तर काही जण त्यांना मक्का, मध्य पूर्व, रशिया व इतर भागांमध्ये बघितले असल्याचे सांगत राहिले. ते जीवंत असल्याचा कोणताही पुरावा नसल्यामुळे ब्रिटीशांनी अंतिमत: 1896 मध्ये त्यांची फाईल बंद केली. 'हिस्टरी हंटरच्या' अंतिम भागात 8 जानेवारी 2024 रोजी रात्री 9 वाजता डिस्कव्हरी+ आणि डिस्कव्हरी चॅनलवर दुस-या नाना साहेब पेशव्यांची ही जीवन कहाणी नक्की पाहा.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.