पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणी ताज्या झाल्या - शिवानी रांगोळे*
January 09, 2024
0
*पहिल्या मकरसंक्रांतीच्या आठवणी ताज्या झाल्या - शिवानी रांगोळे*
२०२४ चा पहिला सण आणि त्यात लग्नानंतरची पहिली संक्रांत ही नेहमी खास असते झी मराठीची मालिका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' ह्या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अक्षराची ही पहिली मकरसंक्रांत आहे आणि त्या निम्ममताने शिवानी रांगोळे नी आपल्या लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रातीच्या आठवणी ताज्या करताना सांगितले कि," विराजस आणि माझ्या लग्नानंतरच्या पहिल्या मकरसंक्रांतला आम्ही हलव्याचे दागिने घालून छान फोटोशूट केला होता. ह्या वर्षी विराजस त्याच्या नाटकाच्या प्रयोगात व्यस्त आहे आणि मी 'तुला शिकवीन चांगलाच धडाच्या' शूटिंग मध्ये, पण जर आम्हाला सुट्टी मिळाली तर आम्ही आईच्या हातचं स्वादिष्ट जेवण जेवायला घरी पुण्याला जाऊ. मकरसंक्रांतची अस्सल मज्जा आमच्या पुण्याच्या घरच्या गच्चीवर येते तिथे आम्ही मस्त पतंग उडवतो.
झी मराठीवर बघायला विसरू नका 'तुला शिकवीन चांगलाच धडा' सोमवार- शनिवार रात्री ८:०० वाजता.