Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

श्रीदेवी प्रसन्न" ह्या पहिल्या वाहिल्या मराठी चित्रपटाचं गाणं “दिल में बजी गिटार” प्रदर्शित

*टिप्स फिल्म्स आणि कुमार तौरानी ह्यांच्या "श्रीदेवी प्रसन्न" ह्या पहिल्या वाहिल्या मराठी चित्रपटाचं गाणं “दिल में बजी गिटार” प्रदर्शित* *भव्य दिव्य सोहळ्यात चित्रपटाच्या कलाकारांची उपस्थिती* टिप्स फ़िल्म मराठी हे मनोरंजनाच्या दुनियेतील एक मोठे नाव! "श्रीदेवी प्रसन्न" या सिनेमातून त्यांनी आता मराठी चित्रपट निर्मिती क्षेत्रात प्रवेश केला आहे. सिनेमावेड्या फॅमिलीज ही ह्या सिनेमाची एक थीम आहे आणि म्हणूनच काही हिंदी गाणी हटके पद्धतीने ह्या चित्रपटाचा भाग बनली आहेत. 'देखा जो तुझे यार', हे टिप्स चंच गाणं वेगळ्या ढंगात पेश केलं गेलं आहे आणि त्याचा लाँच इव्हेंट तितक्याच शानदार पद्धतीने पार पडला आहे. "श्रीदेवी प्रसन्न" मधून सई ताम्हणकर आणि सिद्धार्थ चांदेकर यांची फ्रेश जोडी येत्या प्रेक्षकांसमोर येणार आहे. टीझर आणि ट्रेलर ला मिळालेल्या रिस्पॉन्सने बोल्ड ब्युटीफुल सई व चॉकलेट बॉय सिद्धार्थ ह्यांच्या फिल्म साठी लोक किती उत्सूक आहेत ते सिद्ध केलं आहेच. येत्या २ फेब्रुवारीला हा चित्रपट सिनेमागृहात प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.
"श्रीदेवी प्रसन्न, या फ्रेश चित्रपटाचे दिग्दर्शन विशाल विमल मोढवे आणि लेखन अदिती मोघे यांनी केले आहे. सहकुटुंब सहपरिवार एन्जॉय करता येईल अशी लोकांपर्यंत आणावी हाच ह्या चित्रपटामागचा थॉट आहे. ही इंटरेस्टिंग गोष्ट नव्या अप्रोच ने प्रेक्षकांसमोर आणण्यात क्रीएटिव्ह प्रोड्युसर्स नेहा शिंदे आणि अविनाश चाटे ह्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. सुलभा आर्य, संजय मोने, वंदना सरदेसाई, शुभांगी गोखले, रमाकांत दायमा ह्यांच्या सारख्या मातब्बर कलाकारांसोबत सिनेमात सिद्धार्थ बोडके, रसिका सुनील, समीर खांडेकर, आकांक्षा गाडे, राहुल पेठे, पल्लवी परांजपे, पूजा वानखेडे, सिद्धार्थ महाशब्दे, जियांश पराडे हे तरुण कलाकार देखील महत्वपूर्ण व्यक्तिरेखा साकारताना दिसणार आहेत. कुमार तौरानी,व टिप्स फिल्मस लि. हे मराठी चित्रपट सृष्टीतल्या आपल्या एंट्री बद्दल होपफ़ुल आहेत. श्रीदेवी प्रसन्न या चित्रपटाच्या माध्यमातून फील गुड, एन्टरटेनिंग, रोमँटिक कॉमेडी ते पडद्यावर आणत आहेत. ह्या सिनेमाच्या निमित्ताने सुरु झालेला टिप्स सिनेमाचा प्रवास मराठी प्रेक्षकांच्या सोबत पुढेही सुरु राहील ह्याची त्यांना आशा आहे.

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.