*"मधुरव बोरु ते ब्लॉग" च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा!*
January 18, 2024
0
*"मधुरव बोरु ते ब्लॉग" च्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा!*
*"काला घोडा फेस्टिवल" या जगविख्यात आणि महत्त्वपूर्ण महोत्सवात पहिल्याच दिवशी मराठीचा जागर होणार!*
*मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा का मिळावा याचं अचूक उत्तर देणारा आणि मराठी भाषेची श्रीमंती दर्शविणारा एक अनोखा कार्यक्रम!*
नाटक नृत्य संगीत याच्या माध्यमातून
दोन हजार वर्षांचा प्रवास मनोरंजनाच्या माध्यमातून उलगडत जाणारी ही कलाकृती यंदाच्या काला घोडा फेस्टिवल च्या शुभारंभाच्या दिवशी म्हणजेच २० जानेवारी २०२४ रोजी संध्याकाळी सात वाजता वाय बी चव्हाण सेंटर नरिमन पॉईंट इथे सादर होणार आहे.
"मराठी असे आमुची मायबोली आम्ही मराठीतच बोलणार" असं म्हणणाऱ्यांपासून "मराठी आहोत हे सांगायला लाज वाटते" असं सांगणाऱ्या नव्या पिढीपर्यंत प्रत्येकाने पाहायलाच हवा असा हा कार्यक्रम. ‘राजभवन‘, ‘गेटवे ऑफ इंडिया‘,‘महाराष्ट्र सदन‘, ‘रॉयल ऑपेरा हाऊस‘ अशा ऐतिहासिक वास्तूमध्ये प्रयोग झाल्यानंतर आता पुन्हा एकदा काला घोडा फेस्टिवल मध्ये याचा प्रयोग होणे ही गौरवाची गोष्ट आहे.
डॉक्टर समीरा गुजर लिखित मधुरा वेलणकर साटम दिग्दर्शित "मधुरव बोरू ते ब्लॉग" या कार्यक्रमाचे संगीत श्रीनाथ म्हात्रे नृत्यदिग्दर्शन सोनिया परचुरे प्रकाशयोजना शितल तळपदे आणि नेपथ्य प्रदीप पाटील यांचे असून मधुरा वेलणकर साटम आकांक्षा गाडे आणि आशिष गाडे यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राच्या बाहेरही गाजत असलेल्या या कार्यक्रमाचा आस्वाद घेण्यासाठी हा कार्यक्रम बघायला विसरू नका. ज्या मराठीमध्ये आपली ओळख दडली आहे त्या मराठीची नव्याने ओळख करून घेण्यासाठी हा कार्यक्रम बघायला नक्की या आणि श्रीमंत व्हा!