हिवाळ्यात कलाकारांची फॅशन ऑन टॉप*
January 18, 2024
0
*हिवाळ्यात कलाकारांची फॅशन ऑन टॉप*
संक्रांतीनंतर महाराष्ट्रात थंडीने जोर पकडला असताना, सर्वत्र फॅशनप्रेमी उबदार आणि स्टायलिश राहण्यासाठी त्यांच्या वॉर्डरोबकडे वळत आहेत. अत्यावश्यक हिवाळ्यातील कपड्यांपैकी, स्वेटर हे आराम आणि फॅशन दोन्ही प्रदान करण्यात चॅम्पियन आहे. तर तुमच्या हिवाळ्यातील फॅशनला उंचावण्यासाठी तुमच्या आवडत्या कलाकारानंहुन मदत घ्या. तितिक्षा तावडे पासून ते शरयू सोनावणे पर्यंत, ह्या नायिका तुम्हाला योग्य शैली निवडण्यासाठी मार्गदर्शन करत आहेत.
'सातव्या मुलीची सातवी मुलगी' मालिकेतील लोकप्रिय अभिनेत्री 'तितिक्षा तावडे' म्हणते, मला हिवाळ्यात लोकरने बनवलेले कॉर्ड- सेट्स घालायला खूप आवडतात. हलक्या रंगाचे स्वेट शर्ट, ओव्हर साइझ टीशर्ट आणि त्या सोबत बॅगी जीन्स हे माझे आवडते कपडे असतात हिवाळ्यात. डोक्यापासून पायापर्यंत एकाच रंगाचे कपडे घालणे ही एक शक्तिशाली स्टाइल निवड आहे. मोनोक्रोमॅटिक पोशाख तुमच्या उंचीला सुंदर रीतीने दाखवते.
'शिवा' च्या वेगळ्या लूकने चर्चेत असलेली 'पूर्वा कौशिक', मला शिवा सारखे मुलांचे कपडे घालायला आवडतात स्वेट शर्ट, टीशर्ट, फुल हातांचे टीशर्ट आणि स्वेटर हे माझा हिवाळ्यातील फॅशन गेम अप करतात. टर्टलनेक हिवाळ्यासाठी बेस्ट निवड आहे. ते केवळ तुम्हाला उबदार ठेवत नाहीत तर ते अजून आकर्षक दिसण्यासाठी मदत करतात.
'सारं काही तिच्यासाठी' मधील लाडकी उमा म्हणजेच 'खुशबू तावडे', हिवाळा आला की माझ्या नवऱ्याच्या म्हणजेच संग्रामच्या वॉर्डरोब मधून जॅकेट्स वापरायला सुरवात करते. मला वेग-वेगळ्या प्रकाराने शाल कपड्यांवर घालायला आवडते. मुंबईत तितकीशी थंडी नसते पण विंटर ओव्हरकोट ही छान वाटतात. इन्फिनिटी स्कार्फ आणि ब्लँकेट स्कार्फ तुमच्या हिवाळ्यातल्या साध्या पोशाखाचे फॅशनेबलमध्ये रूपांतर करू शकतात.
'पारू' ची सध्या सर्वत्र चर्चा होत आहेच तर जाणून घेऊया 'शरयू सोनावणे' चे हिवाळ्यातील वैयक्तिक फॅशन काय आहे. मला जाड लोकरीचे स्वेटर आवडतात. स्टाइलशी तडजोड न करता तुम्हाला या दिवसांसाठी उबदार वाटेल अशा योग्य असलेल्या चंकी लोकरचे मोठ्या साइझचे स्वेटरसह तुम्ही विंटर ट्रेंड स्वीकारु शकतात. त्यासोबत हिवाळ्यात बूटही आरामदायक आणि स्टयलिश दिसतात. तुमच्या पोशाखाला आणि प्रसंगाला अनुरूप अशी शैली निवडा. टोपी आणि हातमोजे केवळ थंडीपासून स्वतःचे संरक्षण करण्यासाठी नाहीत ते स्टाईल स्टेटमेंट करण्यासाठी देखील उत्तम आहेत. हिवाळा फक्त तुमच्या कपड्यांवरच नाही तर तुमच्या त्वचेलाही त्रासदायक असतो. तुमची त्वचा हायड्रेटेड ठेवण्यासाठी आणि थंडीच्या वाऱ्यापासून संरक्षण करण्यासाठी चांगल्या मॉइश्चरायझर आणि लिप बाममध्ये गुंतवणूक करा.
हिवाळ्यात, या स्टाइलिंग टिप्ससह उबदार रहा आणि पाहायला विसरू नका 'सातव्या मुलीची सातवी मुलगी' रात्री १०:३० वाजता, 'सारं काही तिच्यासाठी' संध्या ७:३० वाजता आणि लवकरच भेटीला येणार आहेत 'पारू' आणि 'शिवा' आपल्या झी मराठीवर.