सहकुटुंब सहपरिवार मालिकेतली अंजी झळकणार अबोली मालिकेत
January 24, 2024
0
सहकुटुंब सहपरिवार मालिकेतली अंजी झळकणार अबोली मालिकेत
अभिनेत्री कोमल कुंभार अबोली मालिकेत साकारणार मनवा
स्टार प्रवाहच्या सहकुटुंब-सहपरिवार मालिकेतून घराघरात पोहोचलेली अंजी म्हणजेच अभिनेत्री कोमल कुंभार लवकरच नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अबोली मालिकेत कोमलची एण्ट्री होणार असून मनवा हे पात्र ती साकारणार आहे. मनवाला नाईलाजाने देहविक्रेय व्यवसायात उतरावं लागलं. याविषयी तिच्या मनात सल आहे. अशी वेळ कोणावरही येऊ नये असं तिला वाटतं. अबोलीच्या पुढाकारामुळे मनवाचा शिंदे कुटुंबात प्रवेश होणार का याची उत्सुकता आहे. मनवाचं शिंदे कुटुंबासोबत नेमकं काय नातं आहे हे देखिल मालिकेच्या पुढील भागांमधून स्पष्ट होईल.
अबोली मालिकेतल्या मनवा पात्राविषयी सांगताना कोमल कुंभार म्हणाली, ‘मी पहिल्यांदाच अश्या प्रकारची भूमिका साकारते आहे. लूकही खूप वेगळा आहे. अंजीप्रमाणेच मनवाही ठसकेबाज आहे. अबोलीच्या कुटुंबाने माझं खूप मनापासून स्वागत केलं आहे. पुन्हा एकदा स्टार प्रवाहसोबत काम करतेय याचाही आनंद आहेच. सहकुटुंब सहपरिवार मधल्या अंजीला प्रेक्षकांचं भरभरुन प्रेम मिळालं आहे. हेच प्रेम मनवा या भूमिकेलाही मिळेल याची खात्री आहे. तेव्हा पाहायला विसरु नका अबोली रात्री १०.३० वाजता फक्त स्टार प्रवाहवर.’