Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

" मोऱ्या " चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डाच्या अडचणी वाढतच आहेत

" मोऱ्या " चित्रपटाच्या सेन्सॉर बोर्डाच्या अडचणी वाढतच आहेत दोन कोटी रुपये खर्च करून मोऱ्या हा चित्रपट निर्माण केला आहे. मात्र सेन्सॉर मंडळ व त्यांचे प्रशासन जाणीवपूर्वक अडचण निर्माण करत प्रमाणपत्र देण्यास विलंब करत आहे. त्यामुळे मराठी चित्रपट निर्माते व दिग्दर्शक मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना भेटणार आहेत.अशी माहिती दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी प्रेस क्लब येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली. हा मराठी मोऱ्या चित्रपट लंडन मधे रिलीज झाला.आत्तापर्यंत विविध फेस्टिवल मधे ३५ पुरस्कार मिळाले. मात्र भारतात रिलीज करण्यास त्रास दिला जात आहे.मुद्दाम जाचक अटी शर्ती लाऊन प्रमाणपत्र दिले जात नाही.
तमिळ , तेलगू , हिंदी , कन्नड भाषेत हा चित्रपट डबिंग केला आहे.त्या त्या प्रांतात काही अडचण नाही मात्र महाराष्ट्रात मात्र प्रमाणपत्र मिळत नाही. मोऱ्या हा चित्रपट सप्टेंबर २०२२ मध्ये सेन्सॉर बोर्ड कडे प्रमाणपत्र साठी अर्ज केला . ऑक्टोंबर मध्ये स्क्रीनिंग झाली, त्या नंतर चित्रपट मधे खूप मोठे बदल करण्यास सांगितले , बदल आम्हाला मान्य नसल्यामुळे आम्ही " सेकंड रिवायझिंग कम्युनिटी " कडे गेलो होतो. ३० डिसेंबर २०२२ ला मोऱ्या चित्रपटाचे सेकंड रिवायझिंग मध्ये स्क्रिनिंग झाले तरीही प्रमाणपत्र मिळत नाही. ग्राफिक्स बदलांचा खर्च हा लाखो रुपयांत असल्यामुळे व पैशांची अडचण असल्यामुळे आणि याआधी जवळपास २ कोटींचा खर्च चित्रपटाला झाल्यामुळे पुढील रक्कम उभी करणे अवघड असल्याने आमच्या बाजूने चित्रपटातील बदल करणे अशक्य असल्याने पुन्हा एकदा पूर्ण प्रोसिजर परत करावी लागेल असे सेन्सॉर बोर्डाने सांगितले. तरी आता मुख्यमंत्री यांनीच लक्ष घालावे असे दिग्दर्शक जितेंद्र बर्डे यांनी सांगितले. .

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.