18 दिवस, 27 कार्यक्रम आणि 100हून अधिक शास्त्रीय नृत्य कलावंत; शहर सज्ज होत आहे एनसीपीए मुंबई डान्स सीझन 2024
January 12, 2024
0
18 दिवस, 27 कार्यक्रम आणि 100हून अधिक शास्त्रीय नृत्य कलावंत; शहर सज्ज होत आहे एनसीपीए मुंबई डान्स सीझन 2024 ह्या अत्यंत लोकप्रिय सांस्कृतिक महोत्सवासाठी*
भारतीय शास्त्रीय नृत्यप्रकारांमधील ‘वैविध्यातील एकते’चे दर्शन घडवण्यासाठी कला व संस्कृती प्रेमींना शहरात आमंत्रित करून, नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्सने (एनसीपीए) मुंबई डान्स सीझनच्या 5व्या पर्वाची घोषणा केली आहे. 18 जानेवारी ते 4 फेब्रुवारी ह्या 18 दिवसांच्या काळात हा उत्सव होणार आहे. अनेक उत्साही सादरीकरणे, व्याख्याने, प्रात्यक्षिके, कार्यशाळा तसेच ज्येष्ठ कलावंतांनी घेतलेले संवादी मास्टरक्लासेस ह्या सर्वांचा संयोग ह्या उत्सवात साधला जाणार आहे. प्रस्थापित कलावंत आणि उगवत्या प्रतिभेचा खिळवून ठेवणारा आश्वासक मिलाफ ह्या उत्सवाद्वारे होणार आहे. नृत्याचे कार्यक्रम एनसीपीएच्या सर्व सभागृहांमध्ये तसेच मुंबई, बृहन्मुंबई व नवी मुंबई ह्या भागांतील अन्य ठिकाणीही होणार आहेत.
विविध नृत्यप्रकारांतील कलावंतांना सामूहिक उत्सवासाठी एकत्र आणणारे एक एकात्मिक व्यासपीठ निर्माण करण्याच्या दृष्टीने एनसीपीएने 2018 मध्ये एनसीपीए मुंबई डान्स सीझन हा उपक्रम सुरू केला. आगामी हंगामाचे उद्घाटन 18 जानेवारी रोजी संध्याकाळी 5:00 वाजता प्रख्यात भरतनाट्यम व कथकली कलावंत जयश्री नायर व भरतनाट्यम कलावंत लता राजेश ह्यांच्या हस्ते केले जाणार आहेत. ह्या महोत्सवाच्या को-क्युरेटरही आहेत. नृत्याचा प्रसार, संवर्दन व शिक्षण ह्यांसाठी ह्या दोघी समर्पितपणे काम करतात. ह्या महोत्सवातील सर्व सादरीकरणे देशातील शास्त्रीय नृत्यप्रकारांचा आवाका प्रेक्षकांपुढे मांडतील. मग तो तमीळ साहित्यावर आधारित नृत्यदिग्दर्शनाचा धडा असो किंवा पंडित बिरजू महाराजांना कथकच्या स्वरूपात केलेले वंदन असो. ह्याशिवाय ह्या महोत्सवात परिसंवाद, पुस्तक प्रदर्शने, शास्त्रीय नृत्य व काव्य संध्या तसेच चर्चासत्रे अशा अनेक आकर्षक उपक्रमांचाही समावेश आहे. मुंबईत वेगवेगळ्या ठिकाणी हे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. ह्या सीझनची अंतिम फेरी 4 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता एनसीपीएतील टाटा थिएटरमध्ये रंगणार आहे. संध्याकाळच्या कार्यक्रमाची रचना प्रख्यात मणिपूरी नृत्य कलावंत पद्मश्री दर्शना झवेरी आणि कथकमधील ज्येष्ठ कलावंत डॉ. तुषार गुहा करणार आहेत.
*एनसीपीएच्या नृत्य विभागाचे प्रमुख डॉ. स्वप्नोकल्प दासगुप्ता, एनसीपीए मुंबई डान्स सीझनच्या 5व्या पर्वाबद्दल म्हणाले,* “मुंबई डान्स सीझन हा उपक्रम एनसीपीएने मुंबई व मुंबईबाहेरील संपूर्ण नृत्य कलावंत समुदायाच्या साथीने सुरू केला आहे. हा उपक्रम प्रस्थापित आणि नवोदित कलावंतांना एनसीपीएच्या छत्राखाली एकमेकांशी जोडून घेण्याच्या, नृत्यदिग्दर्शनातील सर्जनशीलता जोपासण्याच्या संधी पुरवतो तसेच अन्य कलावंतांसोबत सहयोग करून सहनिर्मिताला प्रोत्साहन देतो आणि नृत्याशी निगडित अनेकविध कार्यक्रमांच्या विकासाला चालना देतो. ह्याशिवाय प्रेक्षकांनाही भारतीय शास्त्रीय नृत्यांमध्ये अभिरूची विकसित करण्याची क्षमताही आम्ही देतो आणि त्याद्वारे पुढील पिढ्यांमध्येही नृत्याचा सजगतेने प्रसार होईल व कला जतन केली जाईल ह्याची निश्चिती करतो.”
एनसीपीएविषयी:
मुंबईतील नॅशनल सेंटर फॉर द परफॉर्मिंग आर्ट्स (एनसीपीए) भारतातील प्रख्यात सांस्कृतिक संस्था आहे. कलेच्या प्रसारासाठी व ती जतन करण्यासाठी ही संस्था समर्पितपणे काम करते. अतिप्रगत सुविधा व वैविध्यपूर्ण कार्यक्रम ह्यांच्या माध्यमातून एनसीपीएने भारतातील सर्वोत्तम कलाप्रतिभेची जोपासना केली आहे आणि देशातील चैतन्यपूर्ण कला व मनोरंजन क्षेत्राच्या अग्रस्थानी एनसीपीए दीर्घकाळापासून आहे