Breaking Posts

6/trending/recent
Type Here to Get Search Results !

Press Release-"८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी' चित्रपटाचा टीजर लाँच!!

८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी' चित्रपटाचा टीजर लाँच!! केवळ इच्छाशक्तीच्या जोरावर, एकमेकांच्या साथीने समाजात बदल घडवू पाहणाऱ्या तरुणाईची गोष्ट. उदाहरणार्थ निर्मित, सुश्रुत भागवत दिग्दर्शित, ९० हून अधिक पुरस्कारप्राप्त चित्रपट '८ दोन ७५ मध्ये संस्कृती आणि शुभंकरची जोडी - १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला
अनेक महोत्सवांमध्ये गौरवलेला '८ दोन ७५ : फक्त इच्छाशक्ती हवी' हा चित्रपट १९ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. सुश्रुत भागवत दिग्दर्शित या चित्रपटाची मोठी चर्चा असून, चित्रपटाचा टीजर सोशल मीडियावर लाँच करण्यात आला आहे. उदाहरणार्थ निर्मित या निर्मिती संस्थेचे विकास हांडे, लोकेश मांगडे, सुधीर कोलते यांनी "८ दोन ७५" : फक्त इच्छाशक्ती हवी! या चित्रपटाची निर्मिती केली आहे, शर्वाणी - सुश्रुत यांनी चित्रपटाच्या पटकथालेखनाची, तर संजय मोने यांनी संवाद लेखनाची जबाबदारी निभावली आहे. अभिनेता शुभंकर तावडे, अभिनेत्री संस्कृती बालगुडे, शर्वाणी पिल्लई, संजय मोने, आनंद इंगळे, ,राधिका हर्षे - विद्यासागर, अश्विनी कुलकर्णी, विजय पटवर्धन, चिन्मय संत, डॉ .निखिल राजेशिर्के, सीमा कुलकर्णी असे उत्तमोत्तम कलाकार या चित्रपटात आहेत, तर अभिनेता पुष्कर श्रोत्री पाहुण्या कलाकाराच्या भूमिकेत दिसणार आहे. वैभव जोशी यांच्या गीतांना अवधून गुप्ते संगीतबद्ध केलं आहे.
फ्रान्स , सर्बिया, सिंगापूर युनायटेड स्टेट्स, भूतान, यूगोस्लाव्हिया, इटली येथील आंतरराष्ट्रीय फेस्टिव्हल्ससह भारतात, पोंडेचेरी, कलकत्ता, हिमाचल प्रदेश, मुंबई, उटी, सिक्कीम येथील चित्रपट महोत्सवांमध्ये ९० पेक्षाही अधिक पुरस्कार मिळवण्याची दमदार कामगिरी या चित्रपटाने केली आहे. चित्रपटाच्या नावामुळे आणि टीजर प्रदर्शित केल्यापासून चित्रपटाविषयी उत्सुकता निर्माण झाली आहे. ट्रेलरवरून चित्रपटाचा लुक अत्यंत फ्रेश दिसतो आहे. उत्तम कलाकार, उत्तम विषय आणि तांत्रिकदृष्ट्या परिपूर्ण ही या चित्रपटाची प्रमुख वैशिष्ट्यं आहेत. त्यामुळे आता प्रेक्षकांना चित्रपट प्रदर्शित होण्यासाठी १९ जानेवारीपर्यंत वाट पहावी लागणार आहे.
Teaser Link https://www.youtube.com/watch?v=5yePtN0CoIs

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.